sonu sood kapil sharma show 
मनोरंजन

'कपिल शर्मा शो'मध्ये अभिनेता सोनू सूद का झाला भावूक? पाहा व्हिडिओ

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे मनोरंजन विश्वातील शूटींग देखील बंद होती मात्र आता अनलॉक केल्याने हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत तर दुसरीकडे मालिकांच्या शूटींगला आता सुरुवात होऊन नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला देखील आले आहेत. छोट्या पडद्यावरिल 'कपिल शर्मा शो'च्या शूटींगला देखील काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली होती. मात्र या शोमध्ये पहिला पाहूणा कोण असेल याची उत्सुकता होती. अखेर या सेलिब्रिटीची नाव समोर आलं आहे. अभिनेता सोनू सूद या पहिला एपिसोडचा पाहुणा असणार आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी बाहेरगावची लोकं देशाच्या कानाकोप-यात अडकली होती.मजुर कामगारांनी तर त्यांच्या घरी परत जाण्यासाठी शेकडो मैल पायी जाण्याचा पर्याय निवडला होता. मात्र हे सगळं पाहून या परिस्थितीत ज्याने लोकांना उदार होऊन मदत केली त्या सोनू सूदला लोकांनी देवमाणसाची उपमा दिली. त्याचे आभार मानले आणि त्याला आशिर्वाद दिलेत. सोनूचं हे मदतकार्य अजुनही सुरु आहे. त्याच्या मदतीचा ओघ हा केवळ देशातंच नाही देशाबाहेर देखील सुरु आहे. देशाबाहेर अडकलेल्या भारतीयांना सोनू परत आणण्यासाठी मदत करत आहे. त्याचं हे कार्य पाहून त्याला सगळ्यांचेच आशिर्वाद मिळत आहेत आणि हे पाहून सोनू भारावून गेला आहे. 

अनेक दिवसांपासून 'कपिल शर्मा शो'मध्ये सोनू सूद येणार असल्याची चर्चा होती मात्र आता  सोनी टीव्हीने एका प्रोमोमधूनंच जाहीर केलं आहे की त्यांचा पहिला पाहुणा सोनू सूद असणार आहे. हे पोस्ट करताना त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'लाखो लोकांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवून सोनू सूद त्यांच्यासाठी बनला देशातील खरा सुपरस्टार. आणि आता तो येत आहे द कपिल शर्मा शोमधील नवीन एपिसोडमध्ये.' हा एपिसोड १ ऑगस्टला रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचंही यात सांगितलं आहे. 

या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की लोकांनी सोनूसाठी त्यांच्या भावना व्यक्त करत त्याचे आभार मानले आहेत आणि त्याला भरपूर आशिर्वाद दिले आहेत. लोकांचं हे प्रेम पाहून सोनू भावूक झाला आणि त्याला त्याचे अश्रु अनावर झाले. या एपिसोडमध्ये सोनूने लोकांना कशाप्रकारे मदत केली आणि त्यात कशा अडचणी आल्या यावर भाष्य करणार आहे. या एपिसोडची चाहत्यांना खूपंच उत्सुकता आहे.   

sonu sood will be the first guest in kapil sharma show after lockdown  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT