Sonu Sood will give free law education! What are the terms and conditions by sankalpa know details  SAKAL
मनोरंजन

Sonu Sood: कायद्याचं शिक्षण घ्यायचंय? सोनू सूद देणार कायद्याचे मोफत शिक्षण! नियम व अटी काय आहेत?

सोनू सूदच्या माध्यमातुन कायद्याचं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना मोफत शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

Devendra Jadhav

Sonu Sood News: अभिनेता सोनू सूद हा बॉलीवुडमधला आघाडीचा अभिनेता. सोनू सूदने कधी हिरो तर कधी विलन साकारुन बॉलीवुड सिनेमांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. सोनू सुदने स्वतःच्या सामाजिक कार्यातुन त्याच्या चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय.

आता सोनु सुदने शैक्षणिक कार्यात पुढाकार घेतलाय. आता सोनू सूदच्या माध्यमातुन कायद्याचं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना मोफत शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

(Sonu Sood will give free law education!)

काय आहे हा उपक्रम?

सोनू सूद 'संकल्प'च्या माध्यमातुन LAW चं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता येणार आहे. संकल्प हा एक अनोखा आणि मोफत कायदा प्रवेश प्रशिक्षण कार्यक्रम आहे.

जो अनेकांना त्यांच्या व्यावसायिक कायदेशीर शिक्षण घेण्यास आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठांमध्ये (NLUs) एक प्रतिष्ठित स्थान मिळवण्यासाठी सक्षम करणार आहे.

संकल्प बद्दल बोलताना सोनू सूद काय म्हणाला?

'संकल्प'बद्दल बोलताना सोनू सूद म्हणतो " ज्या लोकांना कायद्याची करिअर म्हणून निवड करायची आहे त्यांना गाईड करण्यासाठी देवाने माझी निवड केली आहे हे पाहून मला खूप आनंद होतो. मला खात्री आहे की आपला देश नक्कीच सुरक्षित आणि सक्षम हातात असेल."

संकल्पमध्ये काय आहेत नियम व अटी

ज्यांना कोविड मध्ये नुकसान सहन करावे लागले आहे किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) आले आहे अश्या विद्यार्थ्यांना संकल्प मध्ये LAW चं शिक्षण घेण्यासाठी यात प्राधान्य दिले जाणार आहे.

या अनोख्या संधीचा फायदा सर्व 11वी, 12वी वर्गातील विद्यार्थी आणि अलीकडील पदवीधरांना होऊ शकतो. त्यामुळे LAW चं शिक्षण घेण्यास ईच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना संकल्पचा फायदा मिळणार आहे.

अभिनयाच्या पलिकडे जाऊन नेहमीच सोनू अशी अनेक काम करून पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकत आहे. आता सोनू सूदने हा अनोखा संकल्प केल्याने गरजु विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT