Sony SAB’s Wagle Ki Duniya Cast meets the Honble Maharashtra CM Shri Eknath Shinde to celebrate the show’s 500 episodes sakal
मनोरंजन

Eknath Shinde: 'वागळे'या शब्‍दाशी माझे खास 'नाते! एकनाथ शिंदेंनी सांगितली 'ती' आठवण

'वागळे की दुनिया' या मालिकेच्या 500 भागांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितली ठाण्यातली आठवण..

नीलेश अडसूळ

सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से’ सामान्‍य मध्‍यमवर्गीय भारतीयाच्‍या दैनंदिन समस्‍यांना सुरेखरित्‍या सादर करते. या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही मालिका ५०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण करत असताना कलाकार व टीमने महाराष्‍ट्राचे माननीय मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनीही आपल्या आठवणी कलाकारांसोबत शेयर केल्या.

(Sony SAB’s Wagle Ki Duniya Cast meets the Honble Maharashtra CM Shri Eknath Shinde to celebrate the show’s 500 episodes)

'वागले की दुनिया'च्या टीमने मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची मुंबईतील मलबार हिल येथे त्‍यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा बंगल्‍यावर जाऊन भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे म्‍हणाले, “माझे वागळे शब्‍दाशी सखोल नाते आहे, कारण ठाण्‍यातील वागळे इंडस्‍ट्रीयल इस्‍टेटमध्‍ये सामाजिक कार्यकर्ता म्‍हणून माझ्या प्रवासाची सुरूवात झाली होती. मालिका ‘वागले की दुनिया’ सामान्‍य माणसाच्‍या दैनंदिन संघर्षांना दाखवते. महाराष्‍ट्र राज्‍याचा मुख्‍यमंत्री म्‍हणून मी सामान्‍य माणसाच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती वचनबद्ध आहे.'

पुढे ते म्हणाले, '‘वागले की दुनिया’ने सामान्‍य माणसाच्‍या जीवनाला सादर करत आणि अनेक सामाजिक समस्‍यांशी संबंधित उपाय दाखवत अद्भुत कामगिरी केली आहे. मला आनंद होत आहे की, चॅनेल व निर्मात्‍यांनी असे उपक्रम हाती घेतले आहेत. दैनंदिन मालिका मनोरंजन करण्‍यासोबत उत्तम नैतिक संदेश देखील देत आहेत. मी यशस्‍वीरित्या ५०० एपिसोड्स पूर्ण करण्‍यासाठी या मालिकेच्‍या टीमचे अभिनंदन करतो.'

‘वागले की दुनिया’ ही सोनी सबवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे आणि जीवनाच्‍या विविध स्‍तरांमधील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. ही मालिका मध्‍यमवर्गीय कुटुंबाच्‍या संघर्षाला आणि त्‍यांच्‍या उपायांना सादर करते, ज्‍यामधून प्रेक्षकांना प्रत्‍येकवेळी नवीन बोध मिळतो. स्‍टार कलाकार सुमीत राघवन, परिवा प्रणती, भारती आचरेकर, अंजन श्रीवास्‍तव, चिन्‍मयी साळवी, शीहान कपाही यांच्‍यासह मालिकेचे निर्माते जेडी मजेठिया आणि सोनी सबचे व्‍यवसाय प्रमुख श्री. नीरज व्‍यास यांनी मुख्‍यमंत्र्यांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT