Wonwoo esakal
मनोरंजन

साऊथ कोरियाच्या बँड 70 मधल्या वोनवुच्या आईचे निधन

साऊथ कोरियाई बँड सेव्हंटीन हा जगप्रसिद्ध आहे. त्याचे चाहते जगभरात पसरले आहे.

युगंधर ताजणे

Hollywood News: साऊथ कोरियाई बँड सेव्हंटीन हा जगप्रसिद्ध आहे. त्याचे चाहते जगभरात पसरले आहे. सोशल मीडियावरही त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. त्या बँडमधील रॅपर वोनुवच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Entertainment News) ती म्हणजे वोनवुच्या आईचं निधन झालं आहे. प्लेडिस एंटरटेनमेंटच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, वोनवुची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. वोनवुच्या आईच्या निधनाची बातमी कळताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्या कुटूंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. वोनवु हा सोशल मीडियावर चर्चेत असणारा सेलिब्रेटी गायक आहे. त्याचे फॅन्सची संख्याही मोठी आहे. वोनवु कुटूंबियांच्या उपस्थितीमध्ये वोनवुच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वोनवु हा साऊथ कोरियाचा प्रसिद्ध गायक आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या गाण्याचे चाहते आणि कार्यक्रमाचे निर्माते प्लेडिस एंटरटेनमेंटनं वोननुप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. वोननुला एक छोटा भाऊ देखील आहे. त्याचे नाव जीऑन बोहयुक असे आहे. साऊथ कोरियाई बँड सेवेंटीन, 17 कॅरेट, लव एंड लेटर, डायरेक्टर्स कट, वी मेक यु सारख्या वेगवेगळ्या अल्बमसाठी ओळखले जाते.

गेल्या काही वर्षांपासून जागतिक मनोरंजन विश्वामध्ये कोरिया या देशानं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामध्ये कोरियनं वेब सीरिज, कोरियनं बँड यांचा प्रामुख्यानं समावेश करावा लागेल. आगळी वेगळी मांडणी, विषयातील नाविन्य, त्यातील प्रभावी तांत्रिक बाजु यामुळे कोरियन सीरिज आणि बँडनं जगभरातील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषत तरुणांमध्ये या बँडबद्दल कमालीचे कुतूहल आहे. त्यांचा ओढा या बँडकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT