South Superstar Rajinikanth To Quit Acting After His 171st Film With Lokesh Kanagaraj
South Superstar Rajinikanth To Quit Acting After His 171st Film With Lokesh Kanagaraj Esakal
मनोरंजन

Rajinikanth: रजनीकांत यांचा चित्रपट विश्वाला राम राम ? चाहत्यांची तीव्र नाराजी

Vaishali Patil

साऊथ सिनेसृष्टीतील स्टार बद्दल बोलायचं झालं तर रजनीकांत यांचे नाव टॉप लिस्टमध्ये समाविष्ट आहे. त्यांना अभिनय विश्वाचा मास्टर म्हटलं जात रजनीकांत कोणत्याही वेगळ्या ओळखीवर अवलंबून नाही. रजनीकांतचे चाहते जगभरातून आहेत.

ते त्यांच्या अनेक चित्रपटांसाठी ओळखला जातो. दाक्षिणात्य व्यतिरिक्त हिंदीतही उत्कृष्ट चित्रपट करून या त्यानी आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.

आता रजनीकांत यांच्याबद्दल बातमी समोर आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून लोकेश कनगराजसोबतचा चित्रपट हा रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असू शकतो. अशा चर्चांना उधाण आलं आहे.

तमिळ सुपरस्टार रजनीकांत लोकेश कनागराज दिग्दर्शित त्यांच्या 171 व्या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीतून निवृत्त होण्याचा विचार करत असल्याचं वृत्त आहे.

तमिळ चित्रपट निर्माते मैसस्किन (Mysskin) यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, दिग्दर्शक लोकेश कंगराज यांच्यासोबतचा प्रस्तावित चित्रपट हा सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपट कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असू शकतो. त्यानंतर चर्चाला उधाण आले आहे.

दिग्दर्शकाची ही टिप्पणी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली. पण रजनीकांतच्या अनेक चाहत्यांनी यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला.

रजनीकांत असं करु शकत असं चाहत्यांच म्हणणं आहे. त्याचबरोबर जर ते असं करणार असतील तर त्यांनी त्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणीही चाहते करत आहेत.

रजनीकांत यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर, रजनीकांतच्या 169व्या चित्रपटाचं नाव जेलर आहे. त्याचं शूटिंग पूर्ण झाले आहे.

या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. जेलर 10 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

त्याचबरोबर रजनीकांत 'लाल सलाम' या आणखी एका चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे, ज्याचा लूक नुकताच समोर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT