rajinikanth  
मनोरंजन

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची घोषणा

स्वाती वेमूल

चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी अभिनेते रजनीकांत यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुरस्काराची घोषणा केली. अभिनेते, निर्माते आणि पटकथालेखक म्हणून त्यांची चित्रपटसृष्टीत दिलेलं योगदान हे अतुलनीय आणि अमूल्य असल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले. 
 

रजनीकांत यांचा जन्म बंगळुरूमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी त्यांनी 'बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन'मध्ये कंडक्टर म्हणून काम केलं होतं. रजनीकांत यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली भाषांतील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटसृष्टीत ते त्यांच्या स्टाईलसाठी विशेष ओळखले जातात. कंडक्टर असतानाही तिकिट देण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे ते लोकप्रिय होते. अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी सुरुवातीला नाटकांमध्ये काम केलं. यासाठी त्यांनी कंडक्टरची नोकरी सोडली. एका नाटकादरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक के. बालाचंद्र यांनी रजनीकांत यांना पाहिलं आणि त्यांना चित्रपटाची ऑफर दिली. १९७५ मध्ये रजनीकांत यांनी 'अपूर्व रागंगल' या तामिळ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात त्यांनी केवळ १५ मिनिटांची भूमिका साकारली होती. 

रजनीकांत यांचे केवळ देशभरात नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. रुपेरी पडद्यावरील त्यांची स्टाइल, त्यांचा अॅटिट्यूड यांनी वेडावलेल्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे. रजनीकांत हे पडद्यावर जितके स्टायलिश असतात, तितकेच साधे ते खऱ्या आयुष्यात वावरतात. आतापर्यंत त्यांनी दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT