suriya and jyotika Sakal
मनोरंजन

Suriya - Jyothika: साऊथ सुपरस्टार सूर्या आणि ज्योतिकाने मुंबईत घेतलं तब्बल इतक्या कोटींचं घर, काय नेमकं कारण?

Suriya - Jyothika News: सूर्या शिवकुमार आणि त्याची पत्नी ज्योतिका हे दोन्ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय नावं आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Suriya - Jyothika News: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या सूर्याच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांची नजर असते.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या सुर्याने 'उडान' आणि 'जय भीम' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या शानदार अभिनयाने उत्तर पट्ट्यातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. (Suriya, Jyothika buy lavish house in Mumbai)

यापूर्वी, सूर्या पत्नी ज्योतिका आणि दोन्ही मुलांसह मुंबईत अनेकदा स्पॉट झाला होता. याबाबत आता बातम्या येत आहेत की, सुपरस्टारने मुंबईत 70 कोटींचा महागडा अपार्टमेंट घेतला आहे. सूर्या मुंबईला का शिफ्ट झाला यामागचे कारणही हृदय पिळवटून टाकणारे आहे.

सूर्या आदल्या दिवशी मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी ज्योतिका आणि दोन्ही मुले देव आणि दिया दिसले. सुर्याने पापाराझींना मुलांना कॅमेऱ्यात कैद न करण्याचे आवाहन केले आणि स्वतः पॅप्ससाठी पोज देताना दिसला.

त्याचवेळी, सूर्याला वारंवार मुंबईत स्पॉट होण्याचे कारण म्हणजे तो पत्नी आणि मुलांसह मुंबईत शिफ्ट झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे. सूर्या आणि ज्योतिकाने मुंबई 70 कोटी रुपयांचं घर विकत घेतल्याचं खरं आहे. (Entertainment News in Marathi)

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या करिअरसाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या चर्चांमागील सत्य आता समोर आलं आहे.

दुसरीकडे, दुसरी चांगली बातमी म्हणजे ज्योतिका लवकरच हिंदी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने यासाठी मोठी रक्कम आकारली आहे.(Latest Marathi News)

सूर्या आणि ज्योतिका कायमस्वरूपी मुंबईत शिफ्ट झाले आहेत की नाही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ज्योतिका आणि सूर्याची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 1999 मध्ये पूवेल्लम केतुप्पर या चित्रपटाच्या सेटवर सुर्या आणि ज्योतिका यांची भेट झाली होती.

ज्योतिका ही मुंबईतील पंजाबी कुटुंबातील आहे, तर सुर्या तमिळ आहे. तमिळ भाषेचे ज्ञान नसल्यामुळे ज्योतिकाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. ज्योतिकाच्या समर्पणाने सूर्या खूप प्रभावित झाला.

सुर्या शेवटचा 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसला होता. आता सुर्या दिग्दर्शक सरुथाई शिवासोबत त्याच्या पुढच्या सिनेमावर काम करत आहे. सूर्या 42 पूर्ण झाल्यानंतर, तो वेत्री मारनच्या वाडीवासलमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, ज्योतिका राजकुमार रावसोबत श्रीमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT