sp balasubramanyam 
मनोरंजन

पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम लाईफ सपोर्ट सिस्टीमवर, चाहते करतायेत प्रार्थना

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. बालासुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ते आयसीयुमध्ये सध्या लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत. डॉक्टरांची एक टीम सतत त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे. एसपी बालासुब्रमण्यम यांना ५ ऑगस्टला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 

पार्श्वगायक एसपी सुब्रमण्यम ५ ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने चेन्नईमधील एमजीएन हेल्थ केअर या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. ते गेल्या १० दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या दरम्यान त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारण देखील झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट केलं होतं. तेव्हापासून त्यांची तब्येत नाजूक आहे. एसपी बालासुब्रमण्यम हे लवकर बरे होऊन यावेत यासाठी चाहत्यांपासून सेलिब्रिटी पर्यंत सगळेच प्रार्थना करत आहेत. 

नुकतंच बालासुब्रमण्यम यांनी कोरोना व्हायरसवर गाणं बनवलं होतं. या गाण्यातून त्यांनी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. एसपी बालासुब्रमण्यम यांच्या करिअरविषयी सांगायचं झालं तर त्यांनी १४ वेगवेगळ्या भाषांमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांच्या त्यांच्या पहिल्याच एक दुजे के लिए या हिंदी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.   

sp balasubrahmanyam continuous to be on life support system in icu  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT