Spider Man, Sooryavanshi 
मनोरंजन

'स्पायडर मॅन'समोर 'सूर्यवंशी'ही पडला फिका; पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई

२०२१ या वर्षात सर्वाधिक कमाईने सुरुवात करणारा चित्रपट

स्वाती वेमूल

'स्पायडर मॅन: नो वे होम' (Spider-Man: No Way Home) या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. भारतात पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. २०२१ या वर्षात सर्वाधिक कमाईने सुरुवात करणारा हा चित्रपट ठरला आहे. अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'लाही (Sooryavanshi) 'स्पायडर मॅन'ने मागे टाकलं आहे. 'सूर्यवंशी'ने पहिल्या दिवशी २६.२९ कोटी रुपयांची कमाई केली होती. फक्त 'सूर्यवंशी'च नाही तर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अॅव्हेंजर्स: एंडगेम' (Avengers: Endgame) या चित्रपटाच्या भारतातील पहिल्या दिवसाच्या कमाईलाही 'स्पायडर मॅन'ने टक्कर दिली आहे. (Spider man box office collection)

मार्व्हल स्टुडिओज आणि सोनी पिक्चर्स यांच्या 'स्पायडर मॅन: नो वे होम' या चित्रपटात टॉम होलँड हा मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय झेंडाया, बेनेडिक्ट कुंबरबॅच, विलेम डाफो, आल्फ्रेड मोलिना आणि जेमी फॉक्स यांच्याही भूमिका आहेत. 'बॉक्स ऑफिस इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, स्पायडर मॅनने मल्टिप्लेक्सेसमध्ये चांगली कमाई केली. कोरोना काळानंतर भारतात 'वकील साब' (तेलुगु) आणि 'मास्टर' (तामिळ) या चित्रपटांनंतर हा तिसरा सर्वोत्कृष्ट ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

'स्पायडर-मॅन: नो वे होम' हा या वर्षी भारतात प्रदर्शित होणारा तिसरा मार्व्हल सुपरहिरो चित्रपट आहे. मार्व्हल स्टुडिओने शांग-ची आणि द लेजेंड ऑफ टेन रिंग्ज आणि इटर्नल्स प्रदर्शित केले आहेत. शांग-चीने ३.२५ कोटी रुपये, इटर्नल्सने ८.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. टॉमची मुख्य भूमिका असलेल्या 'स्पायडर मॅन'च्या या चित्रपटाला समिक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral video: लाइव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये ‘तो’ क्षण पकडला, पाकिस्तानी जनरलने महिलेसोबत नेमकं काय केलं? व्हिडिओ व्हायरल

VIDEO : युट्यूबरने गाईला खायला घातले चिकन मोमोज; हिंदू संघटना-गोरक्षक आक्रमक, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

शत्रुघ्न सिन्हा Vs जया बच्चन! 'तुम्ही खुप चांगल्या पँन्ट, शर्ट घालतात, मला फार आवडतात' अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

Hapus Mango : गुजराती आंब्याला हापूसचा दर्जा? कोकणी हापूस अस्तित्वावरून अधिवेशनात भास्कर जाधव आक्रमक, कोकणी मंत्र्यांची खरडपट्टी

Goa Tourism: गोव्यात न्यू इअर साजरा करायचा प्लॅन? या नाईटलाइफ स्पॉट्सल नक्की भेट द्या!

SCROLL FOR NEXT