Splitsvilla 14: Hiba Trabelssi Victim Human trafficking journey..read
Splitsvilla 14: Hiba Trabelssi Victim Human trafficking journey..read Google
मनोरंजन

Splitsvilla 14 च्या स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाली,'भारतात आल्यावर माझ्यासोबत तब्बल 3 दिवस..'

प्रणाली मोरे

Splitsvilla 14 : स्प्लिट्सव्हिला १४ ची स्पर्धक Hiba Trabelssi सध्या जोरदार चर्चेत आहे. या डेटिंग रिअॅलिटी शो मध्ये हिबा आपल्यासाठी परफॅक्ट जोडीदार शोधत आहे. यादरम्यानं तिनं आपल्या आयुष्यातील एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे.

भारतात येऊन सिनेमात काम करण्यासाठी काम मिळवितानाचा संघर्ष तिनं नुकताच सांगितला आहे. एका मुलाखतीत हिबानं आपल्या आयुष्यातील त्या अतिशय वाईट काळाविषयी सांगितलं जेव्हा तिला धोक्यानं किडनॅप केलं गेलं होतं. एवढंच नाही तर ती मानवी तस्करीची शिकार झाली होती हे देखील तिनं शेअर केलं.(Splitsvilla 14: Hiba Trabelssi Victim Human trafficking journey..read)

हिबानं स्प्लिट्सव्हिला १४ च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. ती एक मॉडेल आहे. तसंच ती अभिनयातूनही आपलं कौशल्या दाखवत आहे. तिनं याआधी एका सिनेमात कतरिनाच्या बॉडी डबलच्या रुपात काम केलं होतं. तसंच,एका तेलुगू सिनेमातील गाण्यातही हिबाला अनेकांनी पाहिलं असेल. पण हा इथवरचा प्रवास हिबासाठी खूपच अडचणींचा होता.

आपल्या त्या प्रवासाविषयी बोलतना हिबा म्हणाली, ''मी जेव्हा पहिल्यांदा भारतात यऊन मॉडेलिंग सुरू केलं तेव्हा माझ्यासोबत मोठा धोका झाला होता. खरंतर तो मला मोठा धक्का देणारा काळ होता. मी हादरले होते तेव्हा. मी मानवी तस्करीची शिकार झाले होते आणि मला हे माहितच नव्हतं. माझ्या आयुष्यातील हा मोठा भीतीदायक काळ होता. मी ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास दाखवला होता त्यानेच माझा विश्वासघात केला...त्यावेळी मी पूर्ण खचून गेले होते''.

हिबा पुढे म्हणाली,''तो माझ्यासाठी खूप त्रास देणारा काळ ठरला होता. माझ्या सोबत माणुसकी सोडून ते लोक वागले होते. मला किडनॅप केलं गेलं होतं आणि एका खोलीत मला जेवण न देता, पाणी न देता तीन दिवस बंद केलं गेलं होतं. पण मी हार नाही मानली आणि स्वतःला तिथून बाहेर काढलं. त्या घटनेनं मी खूप घाबरले होते. पण त्याच गोष्टीनं मला खूप बळ दिलं,खूप काही शिकवलं आणि मी आज इथवर प्रवास करु शकले. पण त्या घटनेनं माझ्या मेंदूवर आणि शरीरावर खूप वाईट परिणाम झाला. आता स्प्लिट्सव्हिला १४ मध्ये सहभागी होऊन मी खूश आहे आणि चांगल्या गोष्टी घडतील अशी आशा करते''.

इंडस्ट्रीतील आपल्या प्रवासाविषयी देखील हिबानं संवाद साधला आहे, ती म्हणाली,''जेव्हा मी इंडस्ट्रीत कामाची सुरवात केली होती तेव्हा कोणत्याही ओळखीशिवाय किंवा गॉडफादरशिवाय काम मिळवणं अशक्य होतं. मी माझे पूर्ण प्रयत्न करत आहे आणि पुढे जात आहे. मला विश्वास आहे की एक दिवस मला यश नक्कीच मिळेल आणि इंडस्ट्रीत मी आपली ओळख बनवेन''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

Video: PM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार गट आक्रमक

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT