madhuri 
मनोरंजन

माधुरी दिक्षितसाठी पती नेने यांनी बनवला तिचा आवडता मराठमोळा पदार्थ, माधुरीची मजेशीर रिऍक्शन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सेलिब्रिटींच्या बाबतीत सगळ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते काय काय करतात हे जाणून घ्यायची इच्छा असते. ते फिट राहण्यासाठी काय खातात काय नाही हा देखील चाहत्यांसाठी कुतुहलाचा विषय असतो. सोशल मिडियावर जेव्हा सेलिब्रिटी त्यांच्या रुटीन विषयी पोस्ट करतात तेव्हा कळून येतं की हे देखील सामान्यांंसारखेच जेवण घेत असतात. आता अभिनेत्री माधुरी दिक्षीतचंच घ्या ना. माधुरीची महाराष्ट्रीयन आवडीशी डिश म्हणजे साबुदाणा खिचडी. नुकतीच माधुरीसाठी पती नेने यांनी साबुदाणा खिचडी बनवलीये आणि याचा खास व्हिडिओ माधुरीने शेअर देखील केला आहे.

माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये डॉ. नेने खिचडी बनवताना दिसतायेत तर माधुरी त्यांना शिकवतेय की साबुदाणा खिचडी कशी बनवली पाहिजे. व्हिडिओ पोस्ट करताना माधुरीने कॅप्शन दिलंय की साबुदाणा खिचडी हा तिचा आवडता पदार्थ आहे. विशेष म्हणजे माधुरीने या मराठमोठ्या खाद्यपदार्थाविषयी सांगताना कॅप्शन देखील मराठीतंच दिलंय. तिने म्हटलंय, साबुदाणा खिचडी ऐकूनंच भूक लागली ना ? चला तर मग राम आणि माझ्यासोबत शिका  माझा हा आवडता पदार्थ कसा बनवायचा ते.

हा व्हिडिओ एकदम मजेशीर आहे. यामध्ये नेने किचनमध्ये कुकिंग करतायेत आणि मध्ये मध्ये ते काही गोष्टी माधुरीला विचारतायेत. जसं  ते विचारतात क्युमिनला हिंदीत काय म्हणतात तेव्हा ती म्हणजे जीरं. माधुरी आणि नेनेंचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच पसंत पडतोय. 

सेलिब्रिटींसोबतंच चाहतेही त्यांच्या याव व्हिडिओवर कमेंट करत आहेत. लॉकडाऊनमध्ये माधुरीने घरी बसलेल्यांना डान्सची ऑनलाईन ट्रेनिंग दिली. इतकंच नाही तर तिने पती डॉय नेने यांचा हेअर कट करुन नवीन लूक देखील दिला होता. आता बहुतेक नेनेंना जेवण बनवायची जबाबदारी माधुरीने घेतलेली दिसतेय.   

sriram nene cooked sabudana khichdi for madhuri dixit actress shares video with a reaction  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT