मनोरंजन

मुलगा सुटला, शाहरुख सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार?

दीनानाथ परब

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात (Drug case) अटक झालेला सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan khan) आज 'मन्नत' (Mannat) वर आहे. तब्बल २७ दिवसानंतर आर्यनची काल आर्थररोड कारागृहातून सुटका झाली. मन्नत बाहेर जमलेल्या शाहरुखच्या चाहत्यांनी फटाके फोडून, ढोल-ताशाच्या गजरात काल आर्यन खानचं जोरदार स्वागत केलं. आर्यनच्या सुटकेमुळे सध्या मन्नतवर आनंदाचं वातावरण आहे.

मुलाची सुटका झाल्यामुळे शाहरुख लवकरच प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतो. शाहरुखच्या जवळ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. बाप्पांचे आभार मानण्यासाठी शाहरुख सिद्धिविनायक मंदिरात येऊ शकतो.

शाहरुख दरवर्षी मन्नतवर कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा करतो. मन्नतवर त्याने गणपतीची एक मुर्ती सुद्धा ठेवली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. शाहरुख सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो. पण दरवर्षी घरच्या गणेशोत्सवाचे फोटो तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पण शुक्रवारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागल्यानंतर आर्यनची सुटका शनिवारपर्यंत लांबली. अखेर काल सकाळी आर्यन तुरुंगातून सुटला. आता या प्रकरणात आर्यनला अटक करणारे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ते मुंबई झोनचे प्रमुख आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

Mallikarjun Kharge: मतदानाच्या टक्केवारीत अनेकदा बदल, खर्गेंनी व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगानं फटकारलं

SCROLL FOR NEXT