SS Rajamouli announces new film 'Made In India' After RRR's global success  SAKAL
मनोरंजन

Made in India: RRR फेम राजामौलींनी केली नवी घोषणा, भारतीय सिनेमाचे पितामह मोठ्या पडद्यावर..

RRR च्या भव्यदिव्य यशानंतर राजामौलींनी नव्या सिनेमाची घोषणा केली

Devendra Jadhav

'RRR', 'Bahubuali' आणि अधिक सारख्या लार्जर-दॅन-लाइफ चित्रपटांसह प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल्यानंतर, चित्रपट निर्माते SS राजामौली आणखी एक भव्यदिव्य चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज आहेत.

दिग्दर्शक एस एस राजामौली भारतीय चित्रपटाची कथा सांगणारा चित्रपट सादर करण्याच्या दिशेने काम करत आहे.

'मेड इन इंडिया' असं या सिनेमाचं नाव असुन हा एक बायोपीक असणार आहे. या बायोपिकची निर्मिती राजामौली यांचा मुलगा एसएस कार्तिकेय आणि वरुण गुप्ता यांनी केली आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत.

राम चरण आणि ज्युनियर NTR च्या 'RRR' च्या जबरदस्त यशानंतर, SS राजामौली आणखी एक उत्कृष्ट सिनेमा घेऊन येणार आहेत. डेडलाइनच्या अहवालानुसार, चित्रपट निर्माता ‘भारतीय चित्रपटाचा जन्म आणि उदय’ ही कथा सिनेमाच्या माध्यमातुन सांगण्यास उत्सुक आहे.

राजामौली यांच्या प्रतिनिधीच्या मते, हा चित्रपट सुद्धा भव्यदिव्य असणार यात शंका नाही. राजामौली यांचा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा कोणताही विचार नाही. ते या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार आहेत.

राजामौली यांनी काल सस्पेन्स आणि हाईप तयार केला होता. एस एस राजामौली यांनी ट्विटरवर व्हिडिओसह घोषणा केली. "जेव्हा मी पहिल्यांदा सिनेमाची कथा ऐकली, तेव्हा ही कथा ऐकून मी भावुक झालो. बायोपिक बनवणे खूप कठीण काम आहे. परंतु भारतीय सिनेमाच्या पितामहाची गोष्ट सिनेमाच्या माध्यमातून सर्वांना दाखवणं हे आव्हानात्मक आहे. परंतु आमची टीम त्यासाठी तयार आहेत. मेड इन इंडियाची घोषणा करताना अपार अभिमान वाटतोय” त्यांनी ट्विट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT