Alia bhatt  
मनोरंजन

आलिया साकारणार सीता; राजामौलींच्या RRR चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित 

स्वाती वेमूल

अभिनेत्री आलिया भट्टच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'RRR' या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 'बाहुबली' फेम दिग्दर्शक एसएस राजामौली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याची जोरदार चर्चा आहे. आलियाने सोशल मीडियावर तिचा फर्स्ट लूक पोस्ट केला असून 'सीता' असं कॅप्शनमध्ये लिहिलंय. चित्रपटात आलिया सीतेची भूमिका साकारतेय. भूमिकेला साजेसा असा तिचा लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय. हिरवी साडी, त्यावर मोजके दागिने आणि रोखून ठेवणारी नजर.. असा आलियाचा हा फर्स्ट लूक आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी आलियाने या चित्रपटाचा आणखी एक पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये भगवान श्रीरामाच्या मूर्तीसमोर एक स्त्री बसलेली पाहायला मिळतेय. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया तेलुगू चित्रपटविश्वात पदार्पण करतेय. 

आलियासोबतच या चित्रपटात सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा राम चरण, अजय देवगण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील आलियाच्या भूमिकेविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. जवळपास १० भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्ता प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हा चित्रपटसुद्धा तितकाच भव्यदिव्य आणि 'लार्जर दॅन लाइफ' असेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. याशिवाय आलिया 'ब्रह्मास्त्र' या आणखी एक बिग बजेट चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये ती पहिल्यांदाच बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत काम करणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया, रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT