anjali gaikwad  Team esakal
मनोरंजन

Indian Idol 12; अंजली गायकवाड स्पर्धेबाहेर, चाहते नाराज

आता हा शो पुन्हा चर्चेत आला आहे...

युगंधर ताजणे

मुंबई - इंडियन आयडॉलचा 12 वा सीझन (Indian Idol season 12) सध्याच्या वादाच्या भोव-यात सापडल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी किशोर कुमार यांचे चिरंचीव (amiy kumar) अमित कुमार यांनीही या शो वर टीका केली होती. त्यानंतर इंडियन आयडॉल सीझन 1 चा विजेता अभिजीत सावंतनंही परखड प्रतिक्रिया देऊन इंडियन आयडॉलवर सडकून टीका केली होती. आता हा शो पुन्हा चर्चेत आला आहे याचे कारण म्हणजे यंदाच्या सीझनमधील लोकप्रिय स्पर्धक अंजली गायकवाड ही शो तू बाहेर पडली आहे. (story indian idol 12 shocking elimination anjali gaikwad out)

सोशल मीडियावर (social media) सध्या अंजली गायकवाडच्या (anjali gaikwad) नावाची मोठी चर्चा आहे. अंजली स्पर्धेबाहेर पडल्याचे कळताच तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिला इतर स्पर्धकांच्या तुलनेत कमी वोटिंग झाल्यानं तिला स्पर्धेबाहेर जावं लागलं आहे. मात्र त्यावरुन आता वेगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. त्याला राजकीय वळणही लागलं आहे. कॉग्रेसच्या एका नेत्यानंही याप्रकरणावर प्रतिक्रिया दिल्यानं त्याची चर्चा सुरु झालीयं.

त्या शो मध्ये बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री जीनत अमान (jeenat aman) आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर आधारित गाण्यांचे सादरीकरण स्पर्धकांनी केले. जीनत यांनी देखील आपल्या बॉलीवूडच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला. हा एपिसोडही सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय़ आहे. शो अधिक रंगतदार करण्यासाठी अनेक गोष्टी स्क्रिप्टेड केल्या जातात का, असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत.

कॉग्रेसचे नेते अजय माकन यांनी इंडियन आयडॉलविषयी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे, सध्या त्यांच्यासाठी हा अवघड प्रसंग आहे. सोशल मीडियावर त्याची वेगळ्या प्रकारे चर्चा होत आहे. पुन्हा त्यातून बाहेर येण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT