street dancers 3D prabhudevas new song muqabla released  
मनोरंजन

streetdancer 3D: 25 वर्षांनंतर प्रभुदेवाचा पुन्हा एकदा 'मुकाबला'

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत असतात. चित्रपटामध्ये गाणं आणि डान्स हा अविभाज्य भाग आहे. पण फक्त डान्सवर फार कमी चित्रपट तयार झाले आहेत. त्यामुळे 'ABCD' आणि 'ABCD 2' च्या यशानंतर त्याचाच सिक्वेल असणारा 'स्ट्रिट डान्सर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलर रिलिज झाल्यावर आता या चित्रपटातील नवं दमदार गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. 

हा चित्रपट डान्सवर आधारीत असल्याने साहजिकच इन्डस्ट्रीमधील डान्सर तज्ञ यामध्ये सामिल आहेत. डान्सचा देव म्हणजेच प्रभूदेवा स्ट्रीटडान्सरच्या नव्या गाण्यामध्ये दिसला आहे. पुन्हा एकदा प्रभुदेवाचा जबरदस्त डान्स या गाण्यातून पाहायला मिळाला आहे. हे गाणं प्रत्येकालाच ताल धरायला लावणारं आहे. 25 वर्षांनंतर प्रभुदेवा त्याच्याच गाण्यावर नव्या अंदाजात दिसतो आहे. 'दि किंग ऑफ डान्स' यानेच गाण्याची सुरुवात होते. 

प्रभुदेवाला देशामध्ये डान्सचा बादशाह म्हणून ओळख मिळाली ती 'मुकाबला' या गाण्यानेच. ओरिजिनल 'मुकाबला' गाण्यात प्रभुदेवाने त्याच्या धमाकेदार डान्सने एक वेगळाच दर्जा निर्माण केला. लोकांना प्रभुदेवामध्येच मायकेल जॅक्सनची झलक दिसू लागली. प्रभुदेवाचं हेच आयकॉनिक सॉंग पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारे वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत प्रभुदेवा 'मुकाबला' गाण्यावर जलवा करताना दिसतो आहे. 

मुकाबला गाण्याचं हे रिक्रएशन परंपरा ठाकुर आणि गानायश नार्वेकर यांनी गायलं आहे. तर, तनिष्क बागचीने गाण्याला बोल आणि म्युजिक दिलं आहे. गाण्याची कोरिओग्राफी राहुल शेट्टी आणि राजू सुंदरम यांनी केली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 24 जानेवारी 2020 ला प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाचं दिग्दर्शन डान्सर रेसो डिसूजा याने केलं आहे. सिनेमामध्ये वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभुदेवा आणि नुराह फतेही दिसणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT