subhedar fame digpal lanjekar overwhelmed experience of his fan in pune mumbai food mall  SAKAL
मनोरंजन

Digpal Lanjekar Subhedar: ऑर्डर न करताही गोडधोडाचे पदार्थ आले अन्.. अज्ञात मावळ्याचं प्रेम पाहून दिग्पालच्या डोळ्यात पाणी

पुणे - मुंबई फूड मॉलजवळ दिग्पाल लांजेकर यांना त्यांच्या फॅनचा भन्नाट अनुभव आला

Devendra Jadhav

दिग्पाल लांजेकर यांनी आजवर ४ सिनेमांमधुन छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मोठ्या पडद्यावर साकार केली. दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज अशा चार सिनेमांमधुन महाराजांचे कार्य पोहोचवले.

आता दिग्पाल लांजेकर सुभेदार सिनेमाच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला शिवराज अष्टक मधला नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. अशातच दिग्पाल यांना पुणे - मुंबई फुड मॉलजवळ एक भन्नाट अनुभव आला.

(subhedar fame digpal lanjekar overwhelmed experience)

ऑर्डर न करताही समोर आले गोडधोड पदार्थ

दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केलाय. यात पायनॅपल शिरा आणि त्यासोबत फॅनने एक चिठ्ठी लिहीलेली दिसते.

हा फोटो पोस्ट करुन दिग्पाल लांजेकर म्हणतात.." कधी कधी आपण केलेल्या कामाची विलक्षण पावती मिळते … आज पुण्याहून मुंबई ला जात असताना फूड मॉल वर थांबलो … नाश्ता होईपर्यंत अचानक गोड शिऱ्या च्या डिशेस सर्व्ह केल्या गेल्या … आम्ही हे ऑर्डर केलं नाही हे म्हणेपर्यंत स्वतः मॅनेजर आला आणि त्यानं कुणीतरी हे तुमच्यासाठी ऑर्डर केलं आहे असं हसतमुखानं सांगत ही छोटीशी चिठ्ठी हातात ठेवली… त्यावरचा अगदी मनापासून लिहिलेला हा साधा सरळ संदेश वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं … कुणा अज्ञात मावळ्याचं हे प्रेम …

काय होती अज्ञात फॅनची चिठ्ठी?

दिग्पाल लांजेकर पुढे म्हणतात, "आज मी हे केलं ते केलं म्हणून श्रेय घेण्यासाठीची धडपड मी अनेकदा पाहिली आहे … अशावेळी प्रेम व्यक्त करुन त्याचं समाधान मनात घेऊन समोरही न येणारी ही व्यक्ती चेहरा नसतानाही मनात कायम घर करुन राहील … त्यांच्या या बळ वाढवणाऱ्या अनाम प्रेमाचे आभार सामाजिक माध्यमातून मानतो आहे कारण ते त्यांच्यापर्यंत पोचतील याची खात्री आहे … तुम्ही रसिक मायबाप श्रीशिवराजअष्टक पूर्ण करण्यासाठी असेच पाठीशी उभे राहाल ही खात्री आहे… जय शिवराय."

फॅनने चिठ्ठीत लिहीलंय, दादा तुमचे काम अनन्यसाधारण आहे. तुमच्यामुळे आज महाराजांचा इतिहास समजत आहे. आगामी कामासाठी शुभेच्छा. तुमचा चाहता

सुभेदार सिनेमा २५ ऑगस्टला भेटीला

सुभेदार सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार होता. सिनेमाचं सध्या प्रमोशन जोरात सुरु आहे. पण रविवार रात्री अचानक सुभेदार सिनेमाच्या टीमने जाहीर केलं की, सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार नाही.

काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण अडचणींना न घाबरता आम्ही सिनेमा तुमच्या भेटीला आणणारच आहोत. त्यामुळे तांत्रिक अडचणींवर मात करुन आम्ही सिनेमा २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहोत.

अशाप्रकारे सुभेदार सिनेमा १८ ऑगस्ट नव्हे तर २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत बदल! 'हा' महत्त्वाचा पूल २० दिवस बंद, काय असतील पर्यायी मार्ग?

India T20 World Cup Squad: अजित आगकरने संघ जाहीर केला, तरी १५ जणांमध्ये होऊ शकतो बदल; ICC चा नियम काय सांगतो?

Epstein Files: जेफ्री एपस्टाईनच्या मृत्यूनंतरही ‘काळा इतिहास’ उघड; कागदपत्रे कोण प्रकाशित करत आहे? नेमकी सुत्रे कुणाच्या हाती?

Hrithik Roshan Uttarakhand Trek: हृतिक रोशनने अनुभवला उत्तराखंडच्या डोंगरांचा निसर्गमय ट्रेक; चाहत्यांनी विचारलं ‘जादू मिला क्या?

तरुणी नशेत बेधूंद होऊन घरी आली, घरमालकानं पाहिलं अन् मागून येऊन...; पीजी मालकाचं भयंकर कृत्य; पुणे हादरलं

SCROLL FOR NEXT