subhedar marathi movie box office collection chinmay mandlekar ajay purkar digpal lanjekar SAKAL
मनोरंजन

Subhedar: सुभेदारने संपूर्ण महाराष्ट्रात भगवा रोवला, बॉक्स ऑफीसवर विक्रमी कमाई

सुभेदार सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला असुन सिनेमाने विक्रमी कमाई केलीय

Devendra Jadhav

Subhedar Box Office Collection News: सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर यांची भुमिका असलेला सुभेदार सिनेमा बॉक्स ऑफीसवर तुफान गाजतोय. एकीकडे गदर 2, OMG 2 आणि जेलर सारखे तगडे सिनेमे समोर असताना सुभेदारने बॉक्स ऑफीसवर तुफान कामगिरी केलीय.

(subhedar marathi movie box office collection chinmay mandlekar ajay purkar digpal lanjekar)

सुभेदारची बॉक्स ऑफीसवर विक्रमी कामगिरी

सुभेदार सिनेमा बॉक्स ऑफीसवर ठाण मांडून आहे. हिंदी सिनेमांच्या गर्दीत सुभेदार गाजतोय. सुभेदारचं लेटेस्ट बॉक्स ऑफीस कलेक्शन समोर आलंय. यावरुन सुभेदारने ८.७४ कोटी इतकी कमाई केलीय.

सुभेदारचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर येताच सिनेमाचं नवीन पोस्टर सुद्धा झळकत आहे. या पोस्टरमध्ये कोंढाणा किल्ला दिसत असुन तान्हाजी आणि शिवाजी महाराज एकत्र पाहायला मिळत आहेत.

लहान मुलांसाठी सुभेदारची स्पेशल ऑफर

सुभेदार हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पसंत पडत आहे. तर आता सुभेदार सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा शाळकरी मुलांनी पहावा यासाठी एक खास ऑफर दिली आहे.

यासंबधित एक पोस्ट शेयर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलयं की, "महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी PVR INOX ची विशेष ऑफर ! तिकीट दर फक्त रु. १४० /- मात्र यासाठी काही खास अटी देखील आहेत. त्याम्हणजे

शोची वेळ सकाळी ११ च्या आधी असणे आवश्यक आहे.

आठवड्याच्या दर सोमवार ते गुरुवार फक्त दिवसांसाठी वैध.

कन्फर्मेशन आणि पेमेंट ४८ तासांपूर्वी आले पाहिजे.

सकाळी ११ च्या आधी ज्या वेळेस त्यांना पीव्हीआर आणि आयनॉक्स स्क्रीनची आवश्यकता असेल, ती वेळ देण्यात येईल.

प्रत्येक शोसाठी किमान तिकीट बुकिंग १०० तिकिटे असावी."

या अटींची पुर्तता करुन शालेय विद्यार्थी या ऑफरचा फायदा घेवू शकतात. त्यासाठी मोबाईल क्रमांक देखील देण्यात आला आहे.

तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलयं की, "शालेय विद्यार्थ्यांसाठी तिकिट दर रु.१४०/* फक्त. PVR INOX घेऊन आले आहेत एक विशेष ऑफर.. वरील पोस्ट नीट वाचा आणि गृप बुकींग साठी संपर्क करा!"

सुभेदार मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज

शिवराज अष्टकातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' यानंतर 'सुभेदार' हा पाचवा भाग शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प आहे.

सुभेदार सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Makar Sankranti 2026: तुळशी संबंधित 'या' 3 चुका टाळा, अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT