subhedar marathi movie nagraj manjule postponed his film baaplyok at 1 september SAKAL
मनोरंजन

Subhedar Movie : मराठी सिनेमा जिंदाबाद! सुभेदार साठी नागराज मंजुळेंनी घेतला महत्वाचा निर्णय, वाचा सविस्तर

मराठी सिनेमा कायमच एकमेकांना सपोर्ट करतो याचं उदाहरण नागराज मंजुळेंमुळे नुकतंच समोर आलंय

Devendra Jadhav

Marathi Latest Movie Update : दिग्पाल लांजेकर यांचा सुभेदार सिनेमा काल २५ ऑगस्टपासुन सगळीकडे रिलीज झालाय. सुभेदार सिनेमाची सध्या खुप हवा आहे.

सुभेदार सिनेमाच्या रिलीज डेट मुळे नागराज मंजुळे त्यांची प्रस्तुती असलेल्या बापल्योक सिनेमासाठी महत्वाचा निर्णय घेतला. बघुया काय घडलं.

सुभेदार साठी नागराज मंजुळेंनी रिलीज डेट बदलली?

बाप म्हणजे धाक.. बाप म्हणजे कडक शिस्त.. बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे 'बापल्योक'.

नातं’ या एका शब्दात व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासाचं गुपित दडलंय. माणसाच्या आयुष्यात कित्येकदा नात्याला वळण देणाऱ्या घटना घडतात, या घटनांमधून नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना, त्यावेळी नातं जास्त न ताणता हुडकायचा प्रयत्न करायचा.

अशाने नात्याची प्रत्येक नाजूक गाठ विश्‍वासानं आणि प्रेमानं आपोआप पक्की होईल. हेच सांगू पाहणारा दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘बापल्योक’ हा चित्रपट १ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

बापल्योक सिनेमातले कलाकार

‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

वडिल आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, याचा सुरेख मेळ ‘बापल्योक’ या चित्रपटातून साधला आहे. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत.

(Latest Marathi News)

बारल्योक सिनेमाची टीम

बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे.

अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे. ध्वनी आरेखन पियुष शहा यांचे आहे. वेशभूषा अनुत्तमा नायकवडी तर कलादिग्दर्शन महेश कोरे यांचे आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेत.

रंगभूषा संतोष डोंगरे, कास्टिंग योगेश निकम यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहेत. लाईन प्रोडक्शनची जबाबदारी बहुरूपी प्रोडक्शन्सने सांभाळली आहे. ‘बापल्योक’ हा चित्रपट १ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT