subhedar marathi movie new poster out starring ajay purkar chinmay mandlekar mrinal kulkarni  SAKAL
मनोरंजन

Subhedar Movie: कोंढाणा आणीन स्वराज्यात... सुभेदार सिनेमाची रोमांचकारी नवी झलक समोर

आता सुभेदार सिनेमाची रोमांचकारी नवी झलक समोर आलीय.

Devendra Jadhav

Subhedar Movie News: सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक पर्वातील पाचवा सिनेमा म्हणुन सुभेदार सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे. सुभेदार सिनेमा नरवीर तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे शुर मावळे यांच्या परक्रमावर आधारीत आहे.

सुभेदार सिनेमाचा टीझर आणि सिनेमातलं पहिलं गाणं काही दिवसांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. आता सुभेदार सिनेमाची रोमांचकारी नवी झलक समोर आलीय.

(subhedar marathi movie new poster out)

सुभेदार सिनेमाचं नवीन पोस्टर

सुभेदार सिनेमाचं नवीन पोस्टर चाहत्यांच्या भेटीला आलंय. या पोस्टरमध्ये दिसतं शिवाजी महाराजांच्या चरणांशी तान्हाजी मालुसरे बसले आहेत.

शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांसमोर तान्हाजींनी कोंढाणा मिळवण्याचा विडा उचललेला दिसतोय. जिजाऊ साहेबांच्या चेहऱ्यावर कौतुक तर शिवाजी राजांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसत आहेत.

कोंढाणा आणिन स्वराज्यात, लावतो प्राणांची बाजी,शब्द असे मातोश्री अन राजं, सांगती सुभेदार तान्हाजी, असं कॅप्शन देत अंगावर काटा आणणारं हे रोमांचकारी पोस्टर आज रिलीज झालंय

सुभेदार मधलं मावळं जागं झालं रं पहिलं गाणं

छत्रपती शिवाजी महाराजांना तळपत्या सुर्याची उपमा देऊन मावळं जागं झालं रं हे सुभेदार मधलं पहिलं गाणं आज रिलीज झालंय. या गाण्यात शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांविषयी असलेला आदर आणि सन्मान पहायला मिळतो.

सुभेदार सिनेमाच्या पहिल्याच गाण्यात चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराजांच्या भुमिकेत झळकतो आहे. तर विराजस कुलकर्णी आणि दिग्पाल लांजेकर झळकताना दिसतात.

सुभेदार सिनेमाची रिलीज डेट बदलली

सुभेदार सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झाल्यावर सिनेमाविषयी मोठी अपडेट समोर आलीय. सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे.

सुभेदार सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज होणार होता. पण आता मात्र सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे. सिनेमा आता एक आठवडा आधी म्हणजे १८ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

SCROLL FOR NEXT