subhedar marathi movie new record in book my show highly interested people to watch subhedar  SAKAL
मनोरंजन

Subhedar: 'सुभेदार' च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! रिलीजआधीच 'असा' रेकॉर्ड केलेला पहिला मराठी सिनेमा

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार सिनेमाने रिलीजआधीच एक नवीन रेकॉर्ड केलाय

Devendra Jadhav

Subhedar Marathi Movie News: दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सुभेदार सिनेमा नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमावर आधारीत असणार आहे.

दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकमधील हा पाचवा सिनेमा आहे. दिग्पालचे याआधीचे शिवराज अष्टकमधील चारही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. अशातच सुभेदार सिनेमाने रिलीजआधीच एक नवीन रेकॉर्ड केलाय.

(subhedar marathi movie new record)

सुभेदार सिनेमाचा नवीन रेकॉर्ड, ठरला पहिला मराठी सिनेमा

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे. अशातच सिनेमाच्या टीमने सर्वांना आनंदाची बातमी दिलीय.

"प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट 'सुभेदार' !" हा पहिला मराठी सिनेमा ठरलाय.

अशाप्रकारे ४० हजारांहून अधिक प्रेक्षक रिलीजआधीच सुभेदार सिनेमा पहायला उत्सुक आहेत. Book My Show वर असा रेकॉर्ड करणारा सुभेदार हा पहिलाच मराठी सिनेमा ठरलाय.

मरीन ड्राई्व्हवर सुभेदार सिनेमाचं भन्नाट प्रमोशन

सुभेदार चित्रपटाची टीम आज रविवारी सकाळी मरीन्स ड्राईव्हवर गेली होती. तिथे सुभेदार सिनेमाच्या टीमला भेटायला असंख्य फॅन्सनी गर्दी केली.

यावेळी चिन्मय मांडलेकर, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र अशा सिनेमातील कलाकारांनी तरुणाईसोबत गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला.

या डान्सचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत चिन्मय मांडलेकर आणि सिनेमाचे इतर कलाकार भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सुद्धा सर्व टीमसोबत उपस्थित होते.

सुभेदार सिनेमा २५ ऑगस्टला भेटीला

सुभेदार सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार होता. सिनेमाचं सध्या प्रमोशन जोरात सुरु आहे. पण रविवार रात्री अचानक सुभेदार सिनेमाच्या टीमने जाहीर केलं की, सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार नाही.

काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण अडचणींना न घाबरता आम्ही सिनेमा तुमच्या भेटीला आणणारच आहोत. त्यामुळे तांत्रिक अडचणींवर मात करुन आम्ही सिनेमा २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहोत.

अशाप्रकारे सुभेदार सिनेमा १८ ऑगस्ट नव्हे तर २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT