Manoranjan sakal
मनोरंजन

Subhedar : सुभेदारांच्या घरातील लगीनघाई! तानाजी मालुसरेंच्या जीवनावरील चित्रपटाचा पोस्टर रिलीज

आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटातील एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित

सकाळ डिजिटल टीम

Subhedar - महाराजांच्या प्रत्येक मावळ्याने स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. आयुष्यात फक्त एकच देव मानून कार्य करत राहिले, ते देव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याच्या शूर मावळ्यांचे शौर्य जाणून घेताना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर फार क्वचित चित्रपटातून पाहायला मिळतात.

नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान! त्यांचे भावनिक आणि कौटुंबिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या शौर्याचे पराक्रमी पान उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

''आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं'' अशी गर्जना करत मोहीम फत्ते करणाऱ्या या शूर योद्ध्याला त्यांच्या कुटुंबाने ही तितकीच मोलाची साथ दिली. हा भावनिक पदर ‘सुभेदार’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटातील एक देखणं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. यात मालुसरे यांचं संपूर्ण कुटुंब पाहायला मिळतंय. त्यात त्यांची आई, पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सदैव खंबीर साथ देणारे शेलारमामा दिसत आहेत.

यातील सुभेदारांची भूमिका अभिनेता अजय पूरकर, तर त्यांच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी साकारली आहे. धाकटा भाऊ सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच यशोदाबाईंची भूमिका शिवानी रांगोळे हिने साकारली आहे. मालुसरे कुटुंबीयांचा आधारवड असणाऱ्या शेलार मामांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : विक्रोळीत प्रभाग क्रमांक ११९ मध्ये बोगस मतदान

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री म्हणतात रडीचा डाव मग अधिकाऱ्यांना तुम्ही घरगडी नेमलं का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

Latest Marathi News Live Update : I-PAC प्रकरणात ईडीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची ममता बॅनर्जींना नोटीस

काही निर्मात्यांची मस्ती उतरवली पाहिजे.... दिग्पाल लांजेकरांवर संतापले अमेय खोपकर; म्हणाले- महाराजांवर सिनेमा म्हणून मी गप्प...

Virat Kohli : १४०३ दिवसांनी अव्वल बनलेल्या विराटचे स्थान संकटात; राजकोटमधील चूक पडणार महागात, काही तासांत ताज गमावणार

SCROLL FOR NEXT