Subhedar Movie: Esakal
मनोरंजन

Subhedar Movie: शालेय विद्यार्थ्यांसाठी 'सुभेदार' सिनेमाच्या निर्मात्यांची खास ऑफर, सिनेमाची किंमत फक्त...

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वात ऐतिहासिक सिनेमांची क्रेझ ही वेगळिच आहे. तसाच एक ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो म्हणजे मराठी सुभेदार.

हा सिनेमा 25 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलिज झाला. तेव्हा पासूनच त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. सुभेदार सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली ओपनिंग केली आहे.

सुभेदार सिनेमा पाहायला मराठी प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या कमाईत नक्कीच वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पसंत पडत आहे. तर आता सुभेदार सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा शाळकरी मुलांनी पहावा यासाठी एक खास ऑफर दिली आहे.

यासंबधित एक पोस्ट शेयर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलयं की, "महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी PVR INOX ची विशेष ऑफर ! तिकीट दर फक्त रु. १४० /- मात्र यासाठी काही खास अटी देखील आहेत. त्याम्हणजे

शोची वेळ सकाळी ११ च्या आधी असणे आवश्यक आहे.

आठवड्याच्या दर सोमवार ते गुरुवार फक्त दिवसांसाठी वैध.

कन्फर्मेशन आणि पेमेंट ४८ तासांपूर्वी आले पाहिजे.

सकाळी ११ च्या आधी ज्या वेळेस त्यांना पीव्हीआर आणि आयनॉक्स स्क्रीनची आवश्यकता असेल, ती वेळ देण्यात येईल.

प्रत्येक शोसाठी किमान तिकीट बुकिंग १०० तिकिटे असावी."

या अटींची पुर्तता करुन शालेय विद्यार्थी या ऑफरचा फायदा घेवू शकतात. त्यासाठी मोबाईल क्रमांक देखील देण्यात आला आहे.

तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलयं की, "शालेय विद्यार्थ्यांसाठी तिकिट दर रु.१४०/* फक्त. PVR INOX घेऊन आले आहेत एक विशेष ऑफर.. वरील पोस्ट नीट वाचा आणि गृप बुकींग साठी संपर्क करा!"

त्यामुळे जर तुमचा हा सिनेमा पाहयचा राहिला असेल तर या ऑफरचा फायदा घेत प्रेक्षक आपल्या मुलांसोबत हा सिनेमा पाहण्यासाठी जावू शकतात. सध्या ही पोस्ट व्हायरल हो असून काहींनी या ऑफरला फायद्याची म्हटलं आहे तर काहींनी याला प्रमोशन फंडा म्हटलं आहे.


शिवराज अष्टकातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' यानंतर 'सुभेदार' हा पाचवा भाग शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प आहे.

25 ऑगस्टला रिलिज झालेल्या या सिनेमाने पहिल्या दोन दिवसांची आणि रविवारची कमाई एकत्र करुन सुभेदारने 5. 25 कोटींची कमाई केलीय. तर आता या कमाईचे एकूण आकडे 5.83 कोटी इतके झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : चिपळूणमध्ये आजपासून कोकण विभागीय काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT