subhedar movie mrunmayee deshpande look viral chinmay mandlekar ajay purkar subhedar release date SAKAL
मनोरंजन

Subhedar Movie: सात पिढ्यांना दावते मराठ्यांना नडायचा नतीजा काय असतुया, सुभेदार मधील मृण्मयीचा लूक व्हायरल

सुभेदार सिनेमातील मृण्मयी देशपांडेचा भन्नाट लूक व्हायरल झालाय.

Devendra Jadhav

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. दिग्पालचा शिवराज अष्टकातील पाचवा सिनेमा सुभेदारची सध्या सगळीकडे उत्सुकता आहे.

दिग्पाल लांजकेर आता सुभेदार सिनेमाचं तगडं प्रमोशन करतोय. सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखेची सर्वांना ओळख करुन देतोय. अशातच सुभेदार सिनेमातील मृण्मयी देशपांडेचा भन्नाट लूक व्हायरल झालाय.

(subhedar movie mrunmayee deshpande look viral)

मृण्मयी देशपांडे पुन्हा एकदा केशरच्या भुमिकेत

सुभेदार सिनेमातील मृण्मयी देशपांडेचा लूक सोशल मिडीयावर उघड झालाय. यामध्ये कपाळी मळवट, मोठं कुंकू, नाकात नथ आणि डोळ्यात अंगार अशा भन्नाट लूकमध्ये मृण्मयी देशपांडे दिसतेय.

हात बांधून लई मर्द बनतुया? ह.. हात सोड! मग तुला नाय मुघलांच्या सात पिढ्यांना दावते.. मराठ्यांना नडायचा नतीजा काय असतुया असं कॅप्शन देत मृण्मयीचा सिनेमातील हा लूक रिव्हिल करण्यात आलाय.

या सिनेमाच्या माध्यमातुन मृण्मयी शिवराज अष्टक मधील तिची गाजलेली केशर ही व्यक्तिरेखा पुन्हा साकारताना दिसणार आहे.

सुभेदार सिनेमाची नवी रिलीज डेट

सुभेदार सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार होता. सिनेमाचं सध्या प्रमोशन जोरात सुरु आहे. पण रविवार रात्री अचानक सुभेदार सिनेमाच्या टीमने जाहीर केलं की, सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार नाही.

काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण अडचणींना न घाबरता आम्ही सिनेमा तुमच्या भेटीला आणणारच आहोत. त्यामुळे तांत्रिक अडचणींवर मात करुन आम्ही सिनेमा २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहोत.

अशाप्रकारे सुभेदार सिनेमा १८ ऑगस्ट नव्हे तर २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मरीन ड्राई्व्हवर सुभेदार सिनेमाचं भन्नाट प्रमोशन

सुभेदार चित्रपटाची टीम आज रविवारी सकाळी मरीन्स ड्राईव्हवर गेली होती. तिथे सुभेदार सिनेमाच्या टीमला भेटायला असंख्य फॅन्सनी गर्दी केली.

यावेळी चिन्मय मांडलेकर, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र अशा सिनेमातील कलाकारांनी तरुणाईसोबत गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला.

या डान्सचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत चिन्मय मांडलेकर आणि सिनेमाचे इतर कलाकार भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सुद्धा सर्व टीमसोबत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Tata आणि Reliance ला फटका; ICICI Bank मात्र तेजीत

NCP Sangli Crisis : सांगलीच्या राजकारणात खळबळ! 'राष्ट्रवादी'च्या 35 जणांचे राजीनामे; मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात बंड, स्वीकृत निवडीचा वाद

Latest Marathi News Live Update : पुण्यात विद्यार्थ्यांसाठी स्काऊट-गाईड उन्हाळी शिबिर; ५५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Pune Crime: उरुळीकांचनमध्ये गंभीर घटना; अल्पवयीन मुलावर जबरदस्तीचा प्रयत्न, POCSO कायद्यान्वये कारवाई!

Mobile Booster Tips : तुमचा मोबाईल सतत हँग होतोय? स्लो फोनला ५ मिनिटांत बनवा सुपरफास्ट, एकदा वापरून पाहा 'ही' सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT