Subodh Bhave on Marathi Cinema Instagram
मनोरंजन

Subodh Bhave Video: 'मराठी सिनेमा म्हणजे...', 'या' दिग्गज अभिनेत्याचं नाव घेत सुबोधनं एकाच वाक्यात संपवला विषय

सुबोध भावेचा झी मराठी सोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Subodh Bhave Video : मराठी सिनेइंडस्ट्रीला अनेक दिग्ग्ज कलाकारांनी मोठं केलं आहे. मराठी सिनेमातील बहुतांशी कलाकारांचा पाया घडतो तो नाटकांतून त्यामुळे इथे अभिनयातले मास्टर्स राज्य करतात असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. आता याची यादी बरीच मोठी आहे त्यामुळे नाव नं सांगता थेट मुद्द्यावर बोलूया.

त्याचं झालं असं की सोशल मीडियावर सध्या सुबोध भावेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफाना जीवनगौरव पुरस्कारानं सम्मानित केल्यानंतर , 'मराठी सिनेमा म्हणजे अशोक सराफ जिथे काम करतात ती इंडस्ट्री..' असं म्हणत अशोक मामांचा गौरव केला आहे.

यावेळी मंचावरच नाही तर प्रेक्षकांमधूनही टाळ्यांचा गडगडाट ऐकायला मिळाला. चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणाला आहे सुबोध.(Subodh Bhave on Marathi Cinema Ashok Saraf VIdeo Viral)

झी मराठीचा पुरस्कार सोहळा येत्या २६ मार्च रोजी टेलीव्हिजनवर प्रसारीत केला जाणार आहे. पण त्याधीच या पुरस्कार सोहळ्यातील काही खास क्षण व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर भलतेच व्हायरल झाले आहेत.

या पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना जीवनगौरव देऊन गौरविण्यात आलं. त्यावेळी मंचावर अनेक दिग्गज उपस्थित होते. कलाकारांमध्ये अंकुश चौधरी,सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव,उमेश कामत असे अनेकजण होते. त्यावेळी सुबोला जेव्हा सर्वांतर्फे अशोक सराफ यांच्याविषयी बोलायची संधी मिळाली तेव्हा त्यानं मराठी सिनेमा म्हणजे जिथे अशोक सराफ काम करतात ती इंडस्ट्री असं म्हणत एकाच वाक्यात अख्खा विषयच संपवून टाकला.

अर्थात पुढे सुबोधनं त्यांच्याविषयी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या पण त्याच्या पहिल्या वाक्यानं दस्तुरखुद्द अशोक सराफांचेही मन जिंकलेले दिसून आले.

अशोक सराफ यांच्याविषयी बोलताना सुबोध म्हणाला, '' मराठी सिनेमा म्हणजे अशोक सराफ जिथे काम करतात ती इंडस्ट्री''.

''त्या माणसासोबत काम करायचं स्वप्न दूरच राहिलं.. फक्त त्याला जवळून पहावं ही इच्छा देखील पूर्ण होणं म्हणजे मोठी गोष्ट. आणि कधी कधी आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे तसं आज संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं झी गौरव मध्ये त्यांचा सम्मान होतोय ते देखील त्यांच्या अभिनयावर पोसल्या गेलेल्या आमच्या पिढीतील अभिनेत्यांना त्यांच्याविषयी बोलायची संधी मिळतेय ही खूप मोठी गोष्ट आहे''.'

''एक आईचं दूध आणि एक तुम्हाला घडवणाऱ्या व्यक्तीचं दूध आहे जिच्या कामावरती पोसली गेलेली आमच्यासारखी अख्खी पिढी आहे. त्यांना बघत बघत आम्ही इथपर्यंत आलोय. त्यांना पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे...आमच्यासारख्या अनेक ज्युनिअर कलाकारांकडून मानाचा मुजरा..''

सुबोधचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि नेटकरी देखील कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: महापालिका निवडणुकीत Gen Z ची एन्ट्री! नव्या विचारांची लाट येणार; मतदारांचा कल बदलणार का?

अजय अतुल यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालेलं आणि... असं तयार झालं 'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला' गाणं

Scorpio Horoscope 2026 : वृश्चिक राशीसाठी हे वर्ष कसं असेल, आव्हान पेलण्याची ताकद निर्माण करा...

Indian Army SSC Tech 2026 : भारतीय सेनेत अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! कोणतीच परीक्षा नाही, कशी होणार निवड? पाहा संपूर्ण प्रक्रिया

Latest Maharashtra News Updates Live: जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रोड शोचे आयोजन

SCROLL FOR NEXT