subodh bhave
subodh bhave 
मनोरंजन

‘कट्यार..’ सिनेमाला ५ वर्ष पूर्ण, ‘सुरांशी जुळलेलं नातं आजही कायम' सुबोधची खास पोस्ट

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- मराठी रंगभूमीवरील अजरामर संगीत नाटक म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली’. पाच वर्षांआधी या नाटकावर आधारित ‘कट्यार काळजात घुसली’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सुबोध भावे,सचिन पिळगांवकर, शंकर महादेवन अशा दिग्गज कलाकारांची फौज या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड भावला. नुकतीच या सिनेमाला ५ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

कट्यार काळजात घुसली या सिनेमातील अभिनयासाठी  आणि दिग्दर्शनासाठी सुबोध भावेचं खुप कौतुक झालं त्यामुळे त्याच्यासाठी हा सिनेमा एक वेगळा प्रयोग म्हणून खास आहे. या सिनेमाबद्दलच्या भावना व्यक्त करताना सुबोध सांगतो, “कट्यार प्रदर्शित होऊन ५ वर्ष झाली, या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत जो आनंद आम्हाला मिळाला तोच आनंद आज ५ वर्षानंतरही मिळत आहे. निरागस सुरांशी जुळलेलं नात आजही कायम आहे! कट्यार वर भरभरून प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि खूप प्रेम. त्या सर्व दिग्गजांना विनम्र अभिवादन ज्यांच्यामुळे ही कलाकृती जन्मली आणि माझ्या कट्यारच्या संघाचे ही आभार आणि खूप प्रेम कारण त्यांच्या शिवाय हे स्वप्न सत्यात उतरलं नसतं” अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

सुबोध भावे दिग्दर्शित या सिनेमात सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तन्वरसारख्या कलाकारांची दमदार फौज होती. खास बाब म्हणजे 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाच्या माध्यमातून शंकर महादेवन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तर सुबोधने दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच त्याचं नशीब आजमावलं. 

subodh bhave pens a heartfelt note as his debut directorial katyar kaljat ghusali clocks 5 years  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT