subodh bhave post on jhimma 2 clashes with animal and sam bahadur ranbir kapoor  SAKAL
मनोरंजन

Subodh Bhave: "आजुबाजुला हिंदी सिनेमांच्या गर्दीत आमचा मराठी चित्रपट...", सुबोध भावेची सणसणीत पोस्ट व्हायरल

सुबोध भावेची मराठी सिनेमाबद्दल पोस्ट व्हायरल झालीय

Devendra Jadhav

Subodh Bhave News: सध्या बॉक्स ऑफीसवर हिंदी सिनेमांची चांगलीच स्पर्धा पाहायला मिळतेय. रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा आणि विकी कौशलचा 'सॅम बहादूर' सिनेमा हे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले आहेत.

याशिवाय मराठी मनोरंजन विश्वात झिम्मा 2 सिनेमा रिलीज झालाय. आजूबाजुला दोन बिग बजेट हिंदी मराठी सिनेमा असुनही झिम्मा 2 सुद्धा प्रेक्षकांचं प्रेम मिळवतोय. अशातच सुबोध भावेने याविषयी सोशल मीडियवर सणसणीत पोस्ट लिहीलीय.

सुबोध भावेची पोस्ट व्हायरल

सुबोध भावेने सोशल मीडियावर झिम्मा 2 चा पोस्टर शेअर करुन लिहीलंय की, "आजूबाजूच्या हिंदी सिनेमाच्या गर्दीत आमचा मराठी चित्रपट housefull गर्दीत चालू आहे याचा प्रचंड आनंद. रसिक प्रेक्षकांना धन्यवाद आणि धमाल चित्रपट दिल्याबद्दल... झिम्मा 2 संघाचे खूप कौतूक."

झिम्मा २ चं विक्रमी बॉक्स ऑफीस कलेक्शन

sacnilk च्या अहवालानुसार झिम्मा २ च्या बॉक्स ऑफीस कलेक्शनच्या आकड्यांकडे नजर मारली तर सिनेमाने पहिल्या दिवशी १.२० कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत वाढ झालेली दिसत असुन झिम्मा २ ने २.२५ कोटी कमावले. त्यामुळे झिम्मा २ ने दोन दिवसातच ३ कोटींहून अधिकची कमाई केलीय.

झिम्मा 2 मध्ये तगड्या कलाकारांची फौज

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत,  हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 2 सिनेमात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : ट्रम्पची एक धमकी आणि शेअर बाजार झाला 'लाल'! मात्र ह्या शेअरमधील गुंतवणूकदार मालामाल

Tajmahal Travel : ताजमहलाच्या खऱ्या कबरींचे रहस्य अखेर उघडले, २२ फूट खोल तळघरातील Video viral

ईदला नाहीतर आता 12 जूनला येतोय 'धमाल 4', 'या' कारणामुळे बदलली प्रदर्शनाची तारीख

Shankarpat competition: महिला शंकरपटात लक्ष्मी सोनबावणेने रचला इतिहास! सुंदर-राघव बैलजोडी अव्वल, मल्हार-मोगली दुसऱ्या स्थानी..

UP Health : आरोग्य क्षेत्रात यूपीची 'सुपरफास्ट' प्रगती! २ एम्स आणि ८१ मेडिकल कॉलेजसह बनणार देशाची'आरोग्य राजधानी'

SCROLL FOR NEXT