Subodh Bhave Taali Webseries Esakal
मनोरंजन

Subodh Bhave: 'गणेश- गौरी ही व्यक्तिरेखा...', सुश्मिताच्या 'ताली'चं सुबोधनं केलं कौतूक, असा चित्रपट....

Vaishali Patil

Subodh Bhave On Taali Webseries: बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिची बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'ताली' ही वेबसिरिज 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाली. जिओ सिनेमावर ताली ही वेबसिरिज रिलिज झाली आहे.

एकीकडे चाहते अभिनेत्रीचे कौतुक करताना थकत नाहीत, तर दुसरीकडे या मालिकेतील सीन ट्विटरवर शेअर करत नेटकरी ट्रान्स वुमन असलेल्या गौरीच्या भूमिकेचं कौतुक करत आहे. ट्विरवर 'ताली' सिरिज ट्रेंड करत आहे.

अनेकांनी या वेब सिरिजबद्दल प्रतिक्रिया दिली आहेत. आता मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याने देखील ही सिरिज बघितली आहे आणि त्यानंतर या वेब सिरिजबद्दल त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

तो पोस्टमध्ये लिहितो की,

"श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारीत

ताली ही अप्रतिम वेब मालिका जिओ सिनेमावर पाहिली.

'बस बाई बस' या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गौरी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता.

क्षितीज पटवर्धन मित्रात्यांचे संपूर्ण आयुष्य तू ज्या पद्धतीने तुझ्या लेखणीतून उतरवलं आहेस त्याला तोड नाही.खूप खूप कौतुक तुझे..."

पुढे त्याने या सिरिजमध्ये काम केलेल्या मराठी कलाकारांबद्दलदेखील पोस्टमध्ये उल्लेख करत कौतुक केलं आहे. "हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, नंदू माधव, शितल काळे तुम्ही तुमच्या भूमिका किती सुंदर साकारल्या आहेत. कार्तिक निशाणदार, अर्जुन बरन मित्रांनो अशी निर्मिती करायला धाडस लागतं.अप्रतिम . जिओ सिनेमाचे मनापासून धन्यवाद ही मालिका सादर केल्याबद्दल

रवी जाधव देवा , तुझ्या प्रत्येक कलाकृती मध्ये तुझा खास असा ठसा असतो. या कलाकृतींमध्ये तो कायमचा आमच्या मनावर कोरला गेलाय. प्रेम कृतिका देव गणेश- गौरी ही व्यक्तिरेखा उभी रहाण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे"

पोस्टमध्ये त्याने सुश्मिता सेन यांच्याही अभिनयाचं कौतुक करत लिहिलं की, "सुश्मिता सेन तुम्ही त्या झाला होता. बस इतकेच... श्री गौरी सावंत तुम्हाला मनापासून वंदन"

सुबोध भावे हा इन्स्टाग्रामवर कायमच चर्चेत असतो. नुकतंच सुबोधने ताली या वेबसीरिजच्या पोस्टरचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबर त्याने या सीरिजमध्ये झळकलेल्या कलाकारांच्या अभिनयाबद्दल भाष्य केले आहे. तसेच यातील कथानक आणि लेखन याबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली आहे.(Latest Marathi News)

सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतला हरहुन्नरी अभिनेता आहे. सुबोध भावेने आजवर विविध भुमिका साकारुन मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. तो नेहमीच इतर कालाकारांच्या अभिनयाचं कौतुक करत असतो. सुबोध अलीकडेच फुलराणी आणि वाळवी सिनेमात दिसला होता.

आता त्याने ताली सिरिजबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे आणि ही सिरिज एकदा तरी नक्की पहावी असं आवाहनही केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT