Subodh Bhave Instagram
मनोरंजन

'मुल जन्माला घालण्याआधीही परवानगी घ्यायची का?'; सुबोध भावे स्पष्टच बोलला...

सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत सुबोधनं आपले सिनेमे,वेगवेगळ्या भूमिका यांविषयी मनमोकळा संवाद साधतानाच समाजातील काही न पटणाऱ्या गोष्टींवर थेट निशाणा साधला आहे.

प्रणाली मोरे

Subodh Bhave मराठीतला बायोपीक स्टार अशी ओळख जर सुबोध भावेची करुन दिली तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. 'बालगंधर्व','लोकमान्य','डॉ.काशिनाथ घाणेकर' असे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे करुन सुबोधनं महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वांना अक्षरशः जिवंत करुन पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला धन्य केलं. मालिका,सिनेमा,नाटक,आणि आता ओटीटी प्लॅटफॉरमवरही रुळलेला सुबोध सध्या चर्चेत आहे ते 'बस बाई बस' (Bus Bai Bus) कार्यक्रमाचं निवेदन करत असल्यानं. या निमित्तानं सुबोध भावेनं सकाळ Unplugged या आमच्या पॉडकास्ट कार्यक्रमाच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधला आहे.(Subodh Bhave speaks on Bus Bai Bus Show exprience, his biopic, New movie and trolling)

सकाळ Unplugged कार्यक्रमात सुबोध भावेनं कोणाचा खरपुस समाचार घेतला आहे हे ऐकण्यासाठी ही बातमीत जोडलेली मुलाखत नक्की ऐका.

काही दिवसांपूर्वी सुबोध भावेला त्याच्या एका भाषणातील वाक्यानं बरंच ट्रोल केलं गेलं होतं. पण त्या भाषणाचा कसा 'ध' चा 'मा' केला गेला असं स्पष्टिकरण देत सुबोधनं प्रसार माध्यमं आणि सोबत सोशल मीडियावर ताशेरे ओढले होते. याच ट्रोलिंगविषयी बोलताना सुबोधनं आपल्या स्पष्टवक्तेपणाचा पुन्हा दाखला देत ट्रोलर्सवर थेट निशाणा साधला आहे.

ट्रोलर्सचा खरपुस समाचार घेतानाच सुबोधन 'बस बाई बस' या महिलांविषयक कार्यक्रमा्च्या निवेदनाचा अनुभव सांगत सेटवरचे अनेक किस्से अन् खुलासे या मुलाखतीत केले आहे. राजकीय महिला गेस्ट म्हणून येतात तेव्हा नेमकं सुबोधच्या मनात काय सुरु असतं हे देखील या मुलाखतीत तो स्पष्टपणे बोलला आहे. तेव्हा सुबोधने सांगितलेले ते खुसखुशीत सेटवरचे किस्से ऐकायचे असतील तर बातमीत वर जोडलेल्या सुबोधच्या मुलाखतीच्या लिंकवर क्लीक करा आणि मुलाखत नक्की ऐका.

या पॉडकास्ट मुलाखतीतच सुबोधनं मराठीत अधिकाधिक बायोपिक करण्याचा मान कसा पटकावला याविषयी देखील खुलासा केला आहे. दिग्दर्शकांची बायोपिकसाठी पहिली पसंत तोच का? यावरही त्यानं नेमकं उत्तर दिलं आहे. तेव्हा सुबोधची खुसखुशीत,रोखठोक आणि स्पष्ट मतं मांडणारी ही मुलाखत वर बातमीत जोडली आहे,ऐकायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT