umesh kamat, priya bapat, dada ek good news ahe, dada ek good news ahe natak SAKAL
मनोरंजन

Umesh Kamat - Priya Bapat: अचानक प्रिया - उमेशला मागावी लागली सगळ्यांची माफी, समोर आलं मोठं कारण

प्रिया बापट - उमेश कामत हि मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील जोडी

Devendra Jadhav

Priya Bapat - Umesh Kamat News: प्रिया बापट - उमेश कामत हि मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील जोडी. प्रिया बापटची निर्मिती असलेल्या आणि उमेशची प्रमुख भूमिका असलेले दादा एक गुड न्यूज आहे (Dada Ek Good News Ahe) नाटकाचे प्रयोग जोरात सुरु आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी उमेश - प्रियाने दादा एक गुड न्युज आहे नाटकाचे प्रयोग गाजवले आहेत. पण अचानक प्रिया - उमेशने सोशल मीडियावर घोषणा करून दादा एक गुड न्युज आहे नाटकाचे आगामी प्रयोग रद्द केले आहेत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

प्रिया - उमेशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत उमेश प्रचंड थकलेला दिसत असून तो म्हणतो कि.. गेल्या काही दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे बरं नाहीये... आवाजही बसला आहे.. बोलताना त्रास होत आहे.

पुढे प्रिया सर्वांना सांगते की, त्यामुळे उमेशला डॉक्टरांनी आवाजाला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

त्यामुळे दुर्दैवानं या कारणामुळे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे पुढचे काही प्रयोग रद्द करावे लागत आहेत.' अशी माहिती देत प्रिया आणि उमेशने सर्वांची माफी मागितली आहे.

आज २५ आणि २६ मार्च दादा एक गुड न्युज आहे नाटकाचे प्रयोग वाशी आणि ठाण्याला होते. हे प्रयोग रद्द करण्यात आले असून प्रेक्षकांचे पैसे परत दिले जातील असं सांगण्यात आलं आहे.

उमेश सध्या काही दिवस विश्रांती घेणार असून दादा एक गुड न्युज आहे नाटकाचे प्रयोग काही काळ तरी बंद राहतील. या नाटकात उमेश सोबत आशुतोष गोखले, आरती मोरे, मृगा बोडस असे कलाकार अभिनय करत आहेत. या नाटकात आधी हृता दुर्गुळे अभिनय करायची.

हा व्हिडिओ दिसताच सगळ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत उमेशला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. उमेश सध्या सिनेमात इतका काम करत नसला तरीही दादा एक गुड न्युज आहे नाटकाच्या माध्यमातून तो रंगभूमी गाजवत आहे.

उमेश हा सध्याच्या लोकप्रिय मराठी अभिनेत्यांपैकी असा अभिनेता आहे जो सिनेमात इतका सक्रिय नसला तरीही गेली ३ वर्ष तो दादा एक गुड न्युज आहे नाटकाच्या माध्यमातून नाटकवेड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT