Sudha and kd chandran 
मनोरंजन

सुधा चंद्रन यांना पितृशोक, अभिनेते केडी चंद्रन यांचे निधन

ते ८६ वर्षांचे होते.

स्वाती वेमूल

प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन Sudha Chandran यांचे वडील आणि अभिनेते केडी चंद्रन KD Chandran यांचे निधन झाले. रविवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. केडी चंद्रन यांना डिमेंशिया हा आजार होता. १२ मे रोजी त्यांना मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी १६ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (sudha chandran father actor kd chandran passes away)

केडी चंद्रन यांचा अल्पपरिचय

केडी चंद्रन यांनी काही टीव्ही शोजसोबतच बॉलिवूडमधल्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 'हम है राही प्यार के', 'चायना गेट', 'जुनून', 'मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ', 'जब प्यार किसीसे होता है', 'हर दिल जो प्यार करेगा' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या.

सुधा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 'गुडबाय अप्पा. तुमची मुलगी असल्याचा मला खूप अभिमान आहे. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी तुमची नितीमुल्ये, तुमचा अनुभव, तुमच्या तत्वांशी एकनिष्ठ राहीन असं मी वचन देते. रवी आणि सुधा तुमच्यावर खूप प्रेम करतात. पुढील जन्मातच मला तुमचीच मुलगी होऊन जन्म घेऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करते', अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

केडी चंद्रन यांची मुलगी सुधा चंद्रन या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. बॉलिवूडसोबतच त्यांनी कन्नड, मल्याळम, मराठी, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केलंय. सुधा या भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्यांनी 'नागिन' या मालिकेच्या तिन्ही भागांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही त्यांनी भाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: उकाड्यानंतर गारवा! सांगली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार, गारांचाही मारा

रिटायरमेंट फंडवर सरकारचा मोठा डाव! पेन्शन क्षेत्रात FDI वाढणार, मान्सून अधिवेशनात कायदा बदलणार?

Pune Crime: पुण्यात विद्यार्थ्याचा जीव गेला; यशोतेज ॲकॅडमीच्या संचालकांसह तिघांवर गुन्हा, काय घडलं अन् उचललं टाेकाच पाऊलं!

Tamil Nadu Fireworks Factory Blast : तामिळनाडूत मोठी दुर्घटना; फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १६ ठार, ६ गंभीर जखमी

Maharashtra Police Selection: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी कुटुंबातील रोहन तळपेची महाराष्ट्र पोलिस दलात निवड

SCROLL FOR NEXT