Sugandha Mishra, Sanket Bhosale Welcome Baby Girl Esakal
मनोरंजन

Sugandha Mishra : कॉमेडियन सुगंधा अन् संकेत भोसलेच्या घरी आला नवा पाहुणा! व्हिडिओ व्हायरल

सुगंधा आणि संकेतने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे.

Vaishali Patil

Birth of Sugandha Mishra's baby: 'द कपिल शर्मा शो'मधून लोकप्रिय झालेली कॉमेडियन, गायिका आणि अभिनेत्री सुगंधा मिश्राने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. सुगंधा मिश्रा आई झाली आहे. तिने एका सुंदर परीला जन्म दिला आहे. तिचा पती संकेत भोसले यानेही हॉस्पिटल मधील एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांनी ही बातमी दिली आहे. ज्यात त्याने सुगंधा आणि त्यांच्या छोट्या मुलीची झलक दाखवली आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत संकेत तो वडिला झाल्याचे सांगत आहे. या व्हिडिओत संकेतने इमोजीसह मुलीचा चेहरा लपवला आहे.

तर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'देवाचा सर्वात सुंदर चमत्कार, आमच्या प्रेमाचे प्रतीक देत त्याने आम्हाला आशिर्वाद दिला आहे. आम्हाला एक सुंदर मुलगी झाली आहे. तिच्यावर प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत रहा.'

हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहते सुगंधा आणि संकेत या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. तर अनेक कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

काही दिवसांपुर्वी या कपलने फोटोशूट शेअर करत चाहत्यांना ते आई बाबा होणार ही गोड बातमी दिली होती.

सुगंधा आणि संकेत यांनी बऱ्याच वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर 26 एप्रिल 2021 रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. काही दिवसांपुर्वी त्यांनी फोटोशुट करत आपण आई बाबा होणार असल्याचे सांगितले होते. लग्नाच्या 2 वर्षानंतर दोघेही पहिल्या मुलीचे पालक झाले आहेत.

सुगंधा ही कॉमेडियनसोबत गायिका आणि अभिनेत्री देखील आहे. तिने 2014 मध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनच्या हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला खरी ओळख द कपिल शर्मा शोमध्ये विद्यावतीची भूमिकेतून मिळाली. तर संकेत देखील लोकप्रिय आहे. तो देखील बऱ्याच शो मध्ये दिसला होता. त्याचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT