Suhana Khan Instagram
मनोरंजन

Suhana Khan: सावळ्या रंगावरनं सुहाना खानला हिणवलं जायचं..म्हणाली,'मी १२ वर्षांची होते तेव्हा लोक माझ्या तोंडावर..'

सुहाना खाननं सोशल मीडियावर तिला रंगावरनं ट्रोल करणाऱ्यांविरोधात केलेली पोस्ट चर्चेत आली होती.

प्रणाली मोरे

Suhana Khan: शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. २२ मे रोजी सुहाना खान आपला २३ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूड पदार्पणाआधीच सुहाना सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. सुहानाला तिच्या लूक्सवरनं खूप ट्रोल केलं गेलं. (Suhana Khan Birthday when shah rukh Khan daughter gave befitting response to trollers who bullied her for her skin colour)

सुहाना खानला तिच्या सावळ्या रंगावरनं नेहमीच सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण एकदा मात्र सुहानानं ट्रोलर्सला चांगलाच पलटवार केला होता ते एक पोस्ट शेअर करत आणि तिच्या रंगावरनं तिला हिणवणाऱ्यांना चांगलंच सुनावलेलं.

सुहानाने एक स्क्रीन शॉट शेअर केला ज्यामध्ये कमेंट करत तिच्या रंगावरनं तिला हिणवलं गेलं होतं. आणि तिनं ही पोस्ट करत तिच्या ट्रोलिंगचा देखील खुलासा केला होता.

पोस्ट शेअर करत सुहानानं लिहिलं होतं,''इथे खूप काही सुरु आहे,आणि या समस्येला सुधारण्याची गरज आहे. आणि ही गोष्ट केवळ माझ्याबाबतीत नाही तर त्या सगळ्या तरुण मुलं आणि मुलींसंदर्भात आहे..ज्यांनी कोणत्याही कारणाशिवाय उगाचच आपल्या आयुष्यात या अशा कटू भावनांचा सामना केला''.

ती पुढे म्हणाली,''इथे काही कमेंट्स आहेत ज्या माझ्या सावळ्या रंगावरनं केल्या आहेत. जेव्हा मी १२ वर्षांची होती तेव्हापासून माझ्या सावळ्या रंगाच्या कारणामुळे अनेक महिलांनी आणि पुरुषांनी मी चांगली दिसत नाही असं मला तोंडावर म्हटलं होतं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT