aryan suhana 
मनोरंजन

आर्यनला जामीन मिळताच बहीण सुहानाने पोस्ट केला खास फोटो

तीन शब्दांत व्यक्त केलं प्रेम

स्वाती वेमूल

अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यनला Aryan Bail क्रुझवरील पार्टीप्रकरणी उच्च न्यायालयाने अखेर गुरुवारी जामीन मंजूर केला. आर्यनची आज (शुक्रवार) किंवा शनिवारी सुटका होऊ शकेल. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर त्याची बहीण सुहानाने Suhana Khan सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केला. शाहरुख आणि आर्यन यांच्यासोबतचा लहानपणीचा फोटो तिने पोस्ट केला आहे. 'आय लव्ह यू' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या फोटोंमध्ये शाहरुखसोबत सुहाना आणि आर्यन खेळताना दिसत आहेत. सुहानाच्या या फोटोवर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स केले आहेत. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. एनसीबीने आर्यनच्या जामिनाला केलेला विरोध खोडून काढणारा युक्तिवाद आर्यनच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आर्यन आणि अन्य दोन याचिकाकर्त्यांच्या याचिका मंजू केल्या. जामीन मंजूर का करण्यात आला, याचा तपशीलवार आदेश शुक्रवारी संध्याकाळपर्यंत देणार असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

गौरी खानची खास मैत्रीण महीप कपूरनेही सोशल मीडियावर आर्यन आणि गौरीचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये गौरी खान ही चिमुकल्या आर्यनला तिच्या मिठीत घेतल्याचं पहायला मिळत आहे. या फोटोला सुहानासह आलिया भट्ट, अनिल कपूर, करिश्मा कपूर आणि खुशी कपूर यांनी लाइक केलं. २५ दिवसांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या आर्यनला जामीन मिळताच 'मन्नत' बंगल्याबाहेर चाहत्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT