मनोरंजन

बॉलिवूड पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर; श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टीचं नाव समोर

सुकेश चंद्रशेखरचे श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीसोबतही संबंध होते, ईडीच्या चौकशीत उघड झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

200 कोटींच्या कथित लाँड्रिंगच्या तपासादरम्यान सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) यांनी ईडीसमोर (ED) अनेक खुलासे केले आहेत. सुकेश चंद्रशेखर यांनी सांगितले की ते शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि श्रद्धा कपूरसह (Shraddha Kapoor) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या (Bollywood celebrities) संपर्कात होते. त्यानंतर ईडी आता सर्व सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलवत आहे.

NCB प्रकरणात श्रद्धा कपूरची मदत घेतली जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेश चंद्रशेकर यांनी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरबद्दल सांगितले की, ते श्रद्धाला 2015 पासून ओळखतात. इतकंच नाही तर गेल्या वर्षी ड्रग्ज (drugs) प्रकरणादरम्यान त्याने श्रद्धा कपूरला मदत केली होती. ड्रग्ज प्रकरणी श्रद्धा कपूरला गेल्या वर्षी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. श्रद्धा कपूरसोबत सारा अली खान (Sara Ali Khan), रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनाही एनसीबीसमोर हजर व्हावे लागले.

त्याचबरोबर, पतीच्या सुटकेसाठी शिल्पा शेट्टीने देखील सुकेशशी संपर्क साधला होता.

श्रद्धा कपूरशिवाय सुकेश चंद्रशेखरने चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीचेही नाव घेतले आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी सांगितले की, अलीकडेच शिल्पा शेट्टीने पोर्नोग्राफी (pornography) प्रकरणी तुरुंगात असलेले पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) सशर्त सुटकेसाठी तिने माझ्याशी संपर्क साधला होता.

त्याचबरोबर सुकेश चंद्रशेखरने सांगितले की, तो हरमन बावेजालाही (Harman Baweja) ओळखत होता. हरमन बावेजासोबत तो कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) अभिनीत कॅप्टन (Captain) चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करत होता. सुकेश चंद्रशेखरच्या या खुलाशानंतर आता ईडी या सर्व सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी ईडीने जॅकलिन फर्नांडिस (Jacquline Fernandes) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांचीही चौकशी केली आहे.

सुकेश चंद्रशेखर हा प्रसिद्ध ठग आहे. त्याच्यावर देशभरात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग (Shivinder Singh) आणि मलविंदर सिंग (Malvinder Singh) यांच्यावर दोनशे कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखर, त्यांची पत्नी मारिया पॉल (Maria Paul) यांच्यासह अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्यावर एआयडीएम चे नेते दिनाकरण यांच्याकडून निवडणूक चिन्ह मिळवण्याच्या नावाखाली २ कोटी रुपये उकळल्याचा आरोप देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT