Sukh Mhanje Nakki Kay Asta marathi serial on star pravah takes six years leap sakal
मनोरंजन

Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुख म्हणजे.. मालिकेत मोठा ट्विस्ट, झाला हा बदल..

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत ६ वर्षांच्या लीपनंतर गौरी-जयदीपच्या नात्यात येणार नवं वळण..

नीलेश अडसूळ

Sukh Mhanje Nakki Kay Asta: स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेचं कथानक ६ वर्षांनी पुढे सरकलं असून जयदीप-गौरीच्या नात्यात नवं वळण येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच जयदीप-गौरीला कन्यारत्न झालं. शिर्केपाटील कुटुंबात चिमुकलीच्या आगमनाने आनंदाचं वातावरण होतं. मात्र आपल्या लेकीला शालिनीपासून धोका आहे ही शंका जयदीपला सतावत होती. यामुळेच आपल्या लेकीला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा जयदीपने निर्णय घेतला आहे. जयदीप आपल्या लेकीसोबत नेमका कुठे आहे याची कल्पना कुणालाच नाही. शालिनीने तर जयदीपचा मृत्यू झाल्याचं जाहिर केलं आहे. गौरीला मात्र जयदीप आणि लक्ष्मी सुरक्षित असल्याचा ठाम विश्वास आहे.

लीपनंतर चिमुकली लक्ष्मी आता मोठी होणार आहे. जयदीप-गौरीच्या लाडक्या लेकीची म्हणजेच लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे बालकलाकार साईशा साळवी. साईशा मुळची पुण्याची. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे. साईशाने अनेक जाहिराती आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम केलं आहे. स्टार प्रवाहच्याच पिंकीचा विजय असो मालिकेतील तिने साकारलेली ओवी सर्वांच्याच आवडीची आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील लक्ष्मी साकरण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. या नव्या टीमसोबत तिची छान गट्टी जमली आहे. साईशा म्हणजेच लक्ष्मी सेटवर सर्वांचीच लाडकी आहे. तेव्हा सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील लक्ष्मीसोबतचा हा नवा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT