Sumeet Pusavale esakal
मनोरंजन

Sumeet Pusavale: "सिरीयलच्या सेटवर योगायोगाने गेलो होतो तो दिवस ..."; बाळूमामांची भूमिका साकारणाऱ्या सुमित पुसावळेनं शेअर केली पोस्ट

सुमितनं नुकतीच एक खास पोस्ट शेअर करुन "बाळूमामाच्या नावानं चांगभलं" या सिरीयलच्या टीमचे आभार मानले आहेत.

priyanka kulkarni

Sumeet Pusavale: अभिनेता सुमित पुसावळे (Sumeet Pusavale) यानं "बाळूमामाच्या नावानं चांगभलं" (Balumamachya Navan Changbhala) या मालिकेत बाळूमामांची भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. अशताच आता सुमितनं या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. सुमितनं नुकतीच एक खास पोस्ट शेअर करुन "बाळूमामाच्या नावानं चांगभलं" या सिरीयलच्या टीमचे आभार मानले आहेत.

सुमितनं "बाळूमामाच्या नावानं चांगभलं" या मालिकेच्या सेटवरील एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "बाळूमामाच्या नावानं चांगभलं...नमस्कार, मी सुमित पुसावळे, खरं तर ही ओळख “बाळुमामा” ह्या नावा व्यतिरिक्त लगेच नाही होत आणि त्याच कारण तर तुम्हाला माहिती आहेच. बोलण्यासारखं, लिहण्यासारख खुप काही आहे.आजही बाळुमामाच्या नावानं चांगभलं सिरीयलच्या सेटवरचा योगायोगाने गेलो होतो तो दिवस आठवतोय, योगायोगाने आणि पुढच्या काही दिवसातच बाळूमामांच्या रोल साठी बोलावणं आलं आणि माझ्या आयुष्यात नवीन पर्व सुरु झालं. बाळूमामांच्या सेवेत रुजू झालो.सगळ्यातआधी ह्या मालिकेचे निर्माते श्री. संतोष अयाचित सर यांचे मनापासून आभार. मला, सुमित पुसावळेला एक वेगळी ओळख दिली, ही ओळख आयुष्यभरासाठी राहील अस काम माझ्याकडून करून घेतलंत. निखिल साने सर, दीपक राजध्यक्ष सर, विराज राजे सर, केदार शिंदे सर.तसेच स्नेहल, गायत्री, अली भाई साई सर, प्रज्ञा, कलर्स मराठी प्रोमो टीम राहुल सर, गणेश सर आणि इतर सर्व कलर्स मराठी टीम यांचे मनापासून आभार, वेळोवेळी माझ्या कामाच्या कौतुक करून मला प्रोत्साहन दिल."

"मालिकेचे दिग्दर्शक केदार सर, D.O.P. रुपेश सर, आशिष भाई, माझा उत्तम मेकअप करणारे राजेश दादा आणि त्याची संपूर्ण टीम, संकेत, प्रसाद, विकी, मयूर, शुभम, रोहन दा, मला बाळुमामाच्या रूपात आणण्यासाठी आमची वेशभूषा टीम, राजेश, पिनाकी दादा, राजेश, सतीश, उपेंदर, संतोष दादा. सेटिंग टीम मारुती दादा, बाबा दादा, संतोष दादा, सावंत मामा. लाईट टीम दया भाई, पांडेजी, अनिस भाई, महेंदर भाई, आणि इतर टीम मेंबर, ट्रॉली टीम सतीश, कॅमेरा टीम सुभाष, गुड्डू भैय्या, अख्खी डायरेकशन टीम, प्राची मॅडम. संपूर्ण प्रोडक्शन टीम, ओंकार,प्रवीण, संदीप, सुमित, प्रेम, विशाल सर, लोकेश दादा. एडिट टीम चे गणेश दादा आणि त्यांची संपूर्ण टीम, स्पॉट टीम जय, अरविंद, रघु, किसना, अनिरुद्ध, सनी. आणि माझ्या सोबतचे हजारो कलाकार तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.मायबाप प्रेक्षकांनो तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल खुप खुप आभार. आजवर मला बाळुमामा म्हणून खुप प्रेम दिलत, खुप साथ दिलीत, मला त्या रोल मध्ये स्वीकारल, माझ्यावर विश्वास ठेवलात अशीच साथ तुम्ही यापुढे ही द्या, असाच विश्वास माझ्यावर ठेवा, आणि असच प्रेम माझ्यावर अन माझ्या कामावर करा.लवकरच भेटूयात,जाता जाता एवढंच म्हणेन, बोला बोला,बाळूमामामाच्या नावानं चांगभलं" असंही सुमितनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT