Sumeet Raghvan shared controversial tweet on aarey forest carshed protestors  
मनोरंजन

Sumeet Raghvan: आरे आंदोलक फालतू आणि बोगस! व्हिडिओ शेअर करत सुमीत राघवनचं वादग्रस्त ट्विट

परदेशातील एक धक्कादायक व्हिडिओ शेयर करत सुमीतने नवा वाद छेडला आहे.

नीलेश अडसूळ

save the aarye : मराठीसह हिंदीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता सुमीत राघवन सध्या बराच चर्चेत आहे. कारण त्याने आपला मोर्चा आरे कारशेड कडे वळवला आहे. करशेड हे आरे इथेच व्हावे यासाठी तो आंदोलकांना प्रचंड धारेवर धरत आहे. त्यांच्यावर सडकून टीका करत आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारशेड आरे मध्येच होईल अशी घोषणा केली आणि हा वाद पुन्हा चिघळला. यावेळी आंदोलक रस्त्यावर उतरले पण सुमीत मात्र त्यांच्यावर ट्विट करून घणाघाती हल्ला करत होता. आज पुन्हा एकदा त्याने आंदोलकांना डिवचलं आहे.

(Sumeet Raghvan shared controversial tweet on aarey forest carshed protestors )

सुमीतनं एक ट्विट शेयर केलं आहे. ज्यामध्ये एक व्हिडिओ आहे, यामध्ये 'फ्रेंचचे नागरिक क्लायमेट चेंज विरोधात आंदोलन करणाऱ्यांची काळजी घेत आहेत, असे उपरोधिक विधान करून व्हिडिओत मात्र एक व्यक्ती आंदोलनकर्त्यांना मारताना दिसत आहे. सुमीतनं हा व्हिडिओ शेयर करत फ्रेंच येथील आंदोलनकर्त्यांची तुलना आरेच्या आंदोलकांशी केली आहे. सोबत एक वादग्रस्त मजकूर लिहिला आहे.

आंदोलकांना मारतानाचा हा व्हिडिओ शेयर करत सुमीत म्हणतो, ''आरेच्या आंदोलकांसोबत आपणही हेच करायला हवं होतं. डोक्यावर चढले आहेत, बोगस फालतू लोक. कामाचे ना कामाचे, ना धामाचे.'' असं म्हणत सुमीतनं आरे आंदोलकांवर टीका केली आहे. सुमीतचे ही प्रक्षोभक ट्विट मोठा वाद निर्माण करणार इतके नक्की. कारण याआधीही त्याने अनेकदा असे वादग्रस्त विधान केले आहे.

मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाच्या गोरेगाव येथील आरे जंगलात होणऱ्या कारशेडला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. मात्र अभिनेता सुमीत राघवन याचा पाठिंबा आहे. त्यानं अनेकदा उघडपणे कारशेडला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे. त्याच्या या विधानांमुळे आंदोलकची त्याच्यावर टीका करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT