Akshaya Naik (Sundara Manamadhe bharli) Google
मनोरंजन

'परफेक्ट फिगर हवी कशाला?' Body Shaming वर अक्षयाचे बिनधास्त बोल

'सुंदरा मना मध्ये भरली' या मालिकेत लतिका ही भूमिका साकारल्यानंतर अक्षया आज महाराष्ट्रातील प्रत्येकाची फेव्हरेट अभिनेत्री बनली आहे.

प्रणाली मोरे

कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली'(Sundara Manamadhye Bharali) ही मालिका सध्या सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. यात लतिका(Latika) ही व्यक्तिरेखा साकारणारी अक्षया (Akshaya Naik) आज महाराष्ट्रातील प्रत्येकाची फेव्हरेट अभिनेत्री बनली आहे. तिच्या अभिनयानं,व्यक्तीमत्त्वानं आणि मालिकेतील भूमिकेच्या ग्राफनं आज प्रत्येक मुलीचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करण्यास सहकार्यच केलं आहे. खरंतर मालिकेतील लीड अभिनेत्रीच्या कुठल्याही मापदंडात अक्षया नाईक बसत नाही. पण मालिकेचा विषय त्या पद्धतीचा असल्यानं अक्षयाला संधी मिळाली अन् तिनं त्याचं सोनं केलं. सकाळ पॉडकास्टला दिलेल्या Execlusive मुलाखतीत अक्षयानं आपली काही रोखठोक मतं मांडली आहेत. आपण कधीच बारीक होणार नाही? असं ठामपणे म्हणताना तिनं त्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. या बातमीत तिच्या मुलाखतीची लिकं जोडलेली आहे. तेव्हा मुलाखत ऐकायला विसरु नका.

हिंदी मालिकांमधनं काम केल्यानंतर अक्षया नाईकनं थेट 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत मध्यवर्ती भूमिकेसाठी आपली वर्णी लावली. आज तब्बल ५०० चा पल्ला या मालिकेनं गाठलाय. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अक्षया नाईकनं जाड दिसणं.डाएट,बारीक होणं याविषयी आपली थेट मतं मांडली आहेत. त्यासोबतच तिनं या मालिकेत नाशिकची भाषा शिकण्यासाठी काय काय केलंय याचा देखील किस्सा शेअर केला आहे. अक्षया कॉनव्हेंट शाळेत शिकलेली,त्यात हिंदी मालिकेत जास्त काम केलेलं त्यामुळे 'इंग्रजी उत्तम,पण मराठीची बोंब' याविषयी सांगताना तिनं आवर्जुन सांगितलं आहे की कोणत्याच भाषेविषयी न्यूनगंड मनात बाळगू नका. अक्षयाची काही स्पष्ट मतं बातमीत जोडलेल्या तिच्या पॉडकास्ट मुलाखतीतनं नक्की ऐका.

मालिकेमुळे आज नाव मिळालेलं असलं तरी करिअरच्या सुरुवातीचं स्ट्रगल आजही लख्ख अक्षयाच्या डोक्यात घर करुन आहे. ते स्ट्रगल कायम लक्षात ठेवल्यानं पाय जमिनीवर राहतील अन् करिअरला गती मिळेल असा तिचा विश्वास आहे. आजही सुरुवातीला अभिनय येत नव्हता म्हणून किंवा Body Shaming वरुन लोकांचे ऐकेलेले टोमणे तिला जसेच्या तसे आठवत आहेत. पण आज करिअरच्या या टप्प्यावर येऊन आपण काहीतरी करुन दाखवलं याचा आनंदही तिला आहे. अक्षयानं अनेक विषयांवर मनसोक्त संवाद साधलाय. Body Shaming वर ती जे बोललीय ते प्रत्येकानं मग मुलगी,मुलगा,स्त्री,पुरुष अशा सगळ्यांनीच ते ऐकायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT