Suniel Shetty talks about actors bond says there is no oneness in  esakal
मनोरंजन

Suniel Shetty: 'बॉलीवूडचा खेळ आता संपलाय! इंडस्ट्रीमध्ये पहिल्यासारखी....' अण्णा काय बोलून गेला?

अण्णा म्हणतो, बॉलीवूड आता हे काही पहिल्यासारखे राहिलेलं नाही. त्यात खूप सारा बदल झाला आहे.

युगंधर ताजणे

Suniel Shetty talks about actors bond says there is no oneness in :

बॉलीवूडचा अण्णा सुनील शेट्टी हा नेहमीच त्याच्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध असणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्या नावाची जोरदार चर्चाही होताना दिसते. काही दिवसांपूर्वी त्यानं बॉलीवूडमधील अराजकतेविषयी आणि भेदभावावर मत व्यक्त केले होते. आता पुन्हा एकदा त्यानं जी प्रतिक्रिया दिली आहे त्याविषयी धाडसानं मतप्रदर्शन केलं आहे.

अण्णा म्हणतो, बॉलीवूड आता हे काही पहिल्यासारखे राहिलेलं नाही. त्यात खूप सारा बदल झाला आहे. प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. पण आपल्यासोबत बाकीचेही मोठे झाले पाहिजे अशी भावना नाही. अशावेळी आपल्याला काय करता येईल याचाही विचार मागे पडला आहे. अशी भावना सुनील शेट्टीनं व्यक्त केली होती. बॉलीवूडमधील एकता संपली आहे. अशा शब्दांत अण्णानं त्याचा राग व्यक्त केला आहे.

पहिल्यांदा सेटवर ज्याप्रकारे मोकळे वातावरण होते ते आता राहिलेले नाही. कोण कशाप्रकारे व्यक्त होईल हे सांगता येत नाही. माणसं एकमेकांशी बोलत नाही. त्याचा तोटा प्रत्येकाला होतो आहे. माहितीची देवाण घेवाण होत नाही. तुम्ही स्वताला प्रत्येकवेळी इतरांपेक्षा जास्त महत्वाचे समजू लागता. आणि त्याचा तुम्हालाच तोटा होतो हे ही लक्षात घेण्याची गरज आहे.

सुनील शेट्टीनं पुढे सांगितले होते की, आज तुम्ही इंडस्ट्रीविषयी बोलायला गेल्यास तर तुमचा आवाज दाबण्याचे काम केले जाते. आणि आता पहिल्या सारखी बॉलीवूडमध्ये एकताही राहिलेली नाही. सगळेजण आपआपले काम पाहतात. त्यांचा स्वार्थ त्यांना जास्त महत्वाचा वाटतो. अशावेळी कुणीही कुणाच्या मदतीला धावून येत नाही ही गोष्ट सांगायची आहे. कुणी कुणाला वाचविण्याचा प्रयत्नही करताना दिसत नाही. त्यामुळे सगळ्यांचा संवाद तुटला आहे.

पहिले दिवस आता नाहीत. हे खेदानं म्हणावे लागते. त्याला कारण आपण सर्वजण आहोत. कोण कुणाशी बोलायला मागत नाही. आपण भले आणि आपले काम भले अशी सगळ्यांची भावना आहे. त्यामुळे संवाद नाही. काही बोलणं होत नसल्याने एकमेकांविषयी फक्त अफवाच माहिती होतात. त्यातून जास्त गैरसमजही होऊ लागतात. असेही सुनील शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT