Suniel Shetty talks about whether he felt insecure seeing akshay kumar success Google
मनोरंजन

Suniel Shetty: एकाच वेळी सुरु केलं करिअर, तरीही कसा पुढे निघून गेला अक्षय?; सुनिल शेट्टी स्पष्टच बोलला..

सुनिल शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिनेमातील आपल्या अपयशावर मोठा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यानं अक्षयचा एका गोष्टीत दाखला दिला आहे.

प्रणाली मोरे

Suniel Shetty: सुनिल शेट्टी आणि अक्षय कुमार खूप वर्षांपासून चांगले मित्र आहेत. दोघांनी जवळपास एकत्रच बॉलीवूडमध्ये आपलं करिअर सुरू केलं होतं. तसंच,अनेक सिनेमांतून एकत्र कामही त्यांनी केलं आहे. अर्थात असं असलं तरी दोघांचा करिअर ग्राफ एकसारखा मात्र नक्कीच नाही. आजच्या काळात पाहिलं तर अक्षय कुमार हा सुनिल शेट्टीपेक्षा सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. याविषयीच सुनिलनं एका मुलाखतीत बोलून दाखवलं आहे. (Suniel Shetty talks about whether he felt insecure seeing akshay kumar success)

'मोहरा','धडकन','हेरा फेरी' सारख्या अनेक सिनेमांतून एकत्र दिसलेले अक्षय कुमार आणि सुनिल शेट्टी यांच्या यशाचा मार्ग खूपच वेगळा आहे. दोघांनी आपल्या करिअरला पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला आहे. अक्षयनं आपण निवडलेल्या मार्गावर प्रवास केल्यानंतर सध्या तो इंडस्ट्रीतला सगळ्यात व्यस्त अभिनेता बनला आहे. तर दुसरीकडे सुनिल शेट्टीचं म्हणणं आहे की त्यानं सिनेमे निवडताना चूक केली आणि त्याचं नुकसान झालं.

आता एका नव्या मुलाखतीत सुनिल शेट्टीला जेव्हा विचारलं गेलं की तो अक्षय कुमारच्या यशावर जळतो का? यावर अभिनेता म्हणाला की,''अजिबात नाही..कारण मी कधीच कुठल्या गोष्टीचं प्रेशर घेत नाही. माझ्याकडे माझं स्वतःचं असं वेगळं जग आहे. आणि मी जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा वाटतं की मी सिनेमांच्या नादात मिस केलं या जगाला. मी खूप गोष्टी आयुष्यात केल्या आणि खूप गोष्टी आज करत आहे आणि त्यात खूश आहे. मी असा माणूस आहे जो आपल्या जगात खूप कम्फर्टेबल आहे. माझं यश...माझ्या काही सिनेमांनी ते मला दाखवलंय..आणि माझं अपयश...याचा दोष मी स्वतःवर घेतो,मी याचा दोष कोणालाही देत नाही. भावनेच्या आहारी जाऊन मी चुकीच्या गोष्टी निवडल्या''.

सुनिल शेट्टी पुढे म्हणाला,''कोणत्याही गोष्टीला घेऊन माझ्या मनात असुरक्षिततेची भावना नाही. अक्षय उलट मला अनेक बाबतील प्रेरणा देतो. सिनेमांसाठी नाही पण कुठल्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि जे तुम्हाला हवंय ते मिळवण्यासाठी. मी कदाचित माझ्या कामाप्रती आधी फोकस नव्हतो. मी कदाचित ज्या कथा मला ऐकवल्या जायच्या त्या सिनेमांच्या स्क्रीप्ट्सकडे जास्त लक्ष नाही दिलं. मला वाटायचं मला सगळं कळतं...आणि तिथेच मी चुकलो.''

हेही वाचा: Swasthyam 2022 : शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी योगाभ्यास

सुनिल शेट्टी पुढे म्हणाला की,''माझ्या करिअरचा विचार केला तर माझ्या काही चुकांनी माझ्या पदरात अपयश टाकलं असं वाटतं. एक काळ होता जेव्हा मी यशाच्या शिखरावर होतो,तेव्हा तिथल्या चंदेरी दुनियेनं माझ्या डोळ्यांवर अहंकाराची पट्टी बांधली होती. मी माझ्या कामाला खूप सहज घ्यायचो. फारसं महत्त्व देखील देत नव्हतो. कोणत्याही कलाकाराला ही गोष्ट विसरायला नको. आता देखील त्या चुकांपासून मी शिकत आहे,मेहनत करतोय आणि अजूनही स्वतःला एक नवशिखाच मानतो''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

VIDEO : खऱ्या प्रेमाचं जिवंत उदाहरण! अपंग पतीला काखेत उचलून घेत महिलेचा ट्रेनने प्रवास; डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडिओ व्हायरल

Delhi Pollution : दिल्लीतील प्रदूषणाचा फटका! 50% वर्क फ्रॉम होम बंधनकारक; बांधकाम मजुरांना मिळणार 10 हजारांची मदत

SCROLL FOR NEXT