sunil grover 
मनोरंजन

सुनील ग्रोवरने शेअर केला मजेदार व्हिडिओ, 'ही' ट्रीक वापरुन एका पोळीच्या बनवल्या १० पोळ्या

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुनील ग्रोवरला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की प्रेक्षकांच मनोरंजन कशा प्रकारे केलं जाऊ शकतं. सुनील ग्रोवरने नुकतंच 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' शो मध्ये गोपी बहु या प्रसिद्ध भूमिकेला रिक्रिएट केलंय. या सीनमध्ये सुनील ग्रोवर टोपी बहुच्या भूमिकेत आहे आणि त्याने केलेला अभिनय सगळ्यांना वेड लावतोय. 

कॉमेडिअन सुनील ग्रोवरने 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' या शोमधील एका सीनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो गोपी बहुची रिक्रिएट केलेली भूमिका टोपी बहु साकारतोय. टोपी बहु तिच्या पतीसाठी जेवणाचा डब्बा घेऊन येते. टोपी बहुचा पती तिची स्तुती करतो आणि म्हणतो चला आज मी १० पोळ्या खाणार आहे.  हे ऐकून टोपी बहु हैराण होते. टोपी बहुने घाईघाईत एकच पोळी डब्ब्यात आणलेली असते. त्यानंतर टोपी बहु पतीला झेरॉक्स मशीन विषयी विचारते.

या मशीन विषयी सांगताना तो म्हणतो की यात कोणतीही गोष्ट टाकली की तिच्या हव्या तेवढ्या कॉपीज निघतात. ही झेरॉक्स मशीन पाहून तिला आयडिया सूचते आणि मग काय होत यासाठी तुम्ही हा मजेदार व्हिडिओ पाहा. हा व्हिडिओ शेअर करताना सुनीलने लिहिलंय, 'टोपी बहु करे तो क्या..'

'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' एक नवीन कॉमेडी शो आहे. ज्यामध्ये मालिकेतील, सिनेमातील मजेशीर पात्र असतात. या शोमध्ये सुगंधा मिश्रा, संकेत भोसले, पारितोष त्रिपाठी, उपासना सिंह, जतिन्दर सुरी आणि सिद्धार्थ सागर या कलाकारांचा समावेश आहे.    

sunil grover aka topi bahu hilarious video from comedy show gangs of filmistan  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT