Sunil Grover Spotted Selling Bhutta and umbrella At Roadside Stall Amid Rain In Pune SAKAL
मनोरंजन

Sunil Grover Video: कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर पुण्यात भर रस्त्यात छत्री अन् कणीस विकतोय? हे आहे कारण

सुनिल ग्रोव्हरचे काही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत

Devendra Jadhav

Sunil Grover Video News: कधी मशहूर गुलाटी, कधी गुत्थी अशा अनेक भुमिकांमधुन सुनिल ग्रोव्हरने प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवले. सुनील ग्रोव्हरने आजवर कॉमेडी भुमिका साकारल्याच शिवाय गब्बर इज बॅक, पटाखा, तांडव अशा सिनेमा आणि वेबसिरीजमधुन गंभीर धाटणीच्या भुमिकाही साकारल्या.

पण सध्या सुनिल ग्रोव्हर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सुनिल ग्रोव्हरचे काही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत सुनिल छत्री आणि कणीस विकताना दिसतोय. काय झालंय नेमकं पाहूया

(Sunil Grover Spotted Selling Bhutta and umbrella At Roadside Stall Amid Rain In Pune)

सुनिलचे व्हिडीओ

गेल्या काही दिवसांत सुनील ग्रोव्हरने त्याच्या इन्स्टा पेजवर असे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओ पाहून सुनीलचे चाहत्यांना आश्चर्य वाटलंय याशिवाय त्यांना काळजी लागुन राहीली आहे.

यामध्ये एका व्हिडिओमध्ये सुनिल ढाब्यासारख्या ठिकाणी रोट्या बनवताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो भाजलेले कणीस विकताना दिसतोय. या व्हिडिओच्या मागे सुनिलने 'मिशन इम्पॉसिबल'चे संगीतही लावले आहे. सुनील ग्रोव्हरने लिहिले आहे - मी पुढील मिशन शोधत आहे. कणीस भाजतानाचा हा व्हिडीओ पुण्यात असल्याचं समजतंय.

याशिवाय.. हा व्हिडिओ शेअर करताना सुनिलने कमेंट बॉक्स बंद केला आहे. ग्रोव्हरने त्याच्या व्हिडिओमधील कमेंट्स बंद केल्या आहेत. एका व्हिडिओमध्ये कमेंट्स सुरू आहेत, तिथे सुनिलचे फॅन लिहित आहेत, "काय अवस्ठा करुन घेतलीय?"

तिसऱ्या व्हिडिओमध्ये सुनिल छत्री विकताना दिसत आहे. त्याने लिहिले आहे की, पाऊस इतका पडला की माझी स्वतःची छत्रीही विकली गेली.

या व्हिडिओनंतर चाहते सुनीलसाठी चिंतेत आहेत. याशिवाय अनेक जण त्याच्या नवीन वेब सीरिजचे प्रमोशन म्हणत आहेत.

एकुणच सुनिलचे हे व्हिडीओ नेमके कशासाठी आहेत, याचा खुलासा लवकरच होईल. पण सध्या सामान्य लोकांमध्ये जाऊन मिसळणं आणि रस्त्यावर वस्तु विकणं, हे सुनिलचं नवं रुप चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

पण त्यांना काळजी सुद्धा लागुन राहीली आहे. दरम्यान सुनिल शाहरुख खानच्या आगामी जवान सिनेमात झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT