Sunil Pal And Krushna Abhishek
Sunil Pal And Krushna Abhishek esakal
मनोरंजन

'कपिल शर्मा शो' सोडून बी ग्रेड चित्रपट करणार? सुनील पालचा कृष्णाला खोचक टोला

सकाळ डिजिटल टीम

Sunil Pal Comment On Actor Krushna Abhishek : टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण कृष्णा अभिषेक नव्या सीझनमध्ये दिसणार नाही. काही दिवसांपूर्वी, फक्त कृष्णाने पुष्टी केली होती की तो यावेळी शोचा भाग नसणार आहे. कृष्णाच्या या निर्णयामुळे चाहते निराश झाले असतानाच आता आणखी एक कॉमेडियन सुनील पाल यांनी अभिनेत्याच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील पाल यांनी कृष्णाला लक्ष्य केले

कॉमेडीन सुनील पालने (Sunil Pal) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो कृष्णाला 'कपिल शर्मा शो' सोडण्याचा सल्ला देताना दिसत आहे. सुनीलने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मी ऐकले आहे की कृष्णा अभिषेकने कपिल शर्मा शो सोडला आहे. तो हे सर्व का करत आहे, मला समजत नाही. हा शो चांगला चालला आहे. चांगले कामही मिळत आहे. पैसेही दुप्पट मिळत आहेत. हा शो सोडल्यानंतर तुम्ही काय कराल?

अशाच छोट्या मालिका किंवा बी आणि सी श्रेणीतील चित्रपट करणार का? या लोकांचे काय होते? कपिल शर्मा शोने (Kapil Sharma Show) व्यासपीठ दिले, नाव दिले, पैसा दिला आहे. कोण शो सोडण्याचा निर्णय घेईल? पुढे तो म्हणाला, की कोणताही कलाकार आपला शो सोडण्याचा निर्णय घेतो. त्याने कपिल शर्मावर परिणाम होणार नाही. कारण त्याचा शो दिवसेंदिवस पुढे जात आहे.(Entertainment News)

कृष्णा अभिषेकने शो का सोडला?

शो सोडण्या मागचे कारण स्पष्ट करताना कृष्णा अभिषेकने (Akrushna Abhishek) सांगितले की, मी आणि कपिल शर्माच्या टीमने काही काळासाठी थोडा ब्रेक घेतला आहे. कपिल शर्मा एक प्रेमळ व्यक्ती असल्याने माझे त्याच्याशी वैयक्तिक वैर नाही. आत्ता मला गोष्टी कशा चालतात हे पाहायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT