sunil shetty to up cm yogi adityanath  over boycott bollywood  boycott  trend  movies in mumbai
sunil shetty to up cm yogi adityanath over boycott bollywood boycott trend movies in mumbai  
मनोरंजन

Sunil Shetty : बॉलिवूडचे स्टार मूग गिळून गप्प, सुनील शेट्टी मात्र बोलला; थेट योगींना सुनावलं…

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग क्षेत्रातील दिग्गज या सोबतच बॉलिवूड मधील काही कलाकारांची भेट घेतली. याभेटीदरम्यान बॉलिवूड चा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टीने सध्या जोरात सुरू असलेल्या बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडबद्दल सुनावलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरलं होतं आहे.

मागील काही दिवसांपासून हिंदी चित्रपटांविरोधात ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ट्रेंड चालवले जात आहेत. याबद्दल उत्तर प्रदेशात फिल्मसीटी उभारण्याच्या तयारीत असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सुनिल शेट्टीने सुनावलं. बैठकीत सर्वांसमोरच त्याने या बद्दल पंतप्रधानांनी हस्तक्षेप करवा यासाठी त्यांच्याशी बोला अशी विनंतीही केली

सुनिल शेट्टी म्हणाला की, "कॉस्ट किंवा सबसिडीची अडचण नाहीये, सध्या अडचण आहे ती प्रेक्षकांची आहे. सध्या प्रेक्षकांना थिअटरमध्ये घेऊन येण अत्यंत महत्वाचे आहे. 'बॉयकॉट बॉलिवुड' हा हॅशटॅग तुम्हच्या नुसत्या सांगण्यावरून बंद होऊ शकतो. लोकांपर्यंत हे पोहचवणं गरजेचे आहे की, आम्ही चांगलं काम ही केलं आहे. एखादं वाईट उदाहरण तर सगळीकडंच असतं त्यामुळे आम्हा सगळ्यांना नावे ठेवू शकत नाहीत"

पुढे बोलताना तो म्हणाला की, "सध्या प्रेक्षकांच्या मनातही अशीच भावना आहे की, हिंदी चित्रपट म्हणजे चांगलं नाही. आम्ही देखील चांगले चित्रपट केले आहेत. हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड हा ट्विटर ट्रेंड कसा रोखता येईल यावर लक्ष दिलं, तर युपी सारखी दुसरी जागा नाही असेही सुनिल शेट्टी म्हणाला. आमच्याबद्दल तयार झालेलं हे वाईट मत दूर होणं गरजेचं आहे" असेही त्यांने म्हटलं.

"हे सांगताना मला दुखः होतंय. आमच्यापैकी ९९ टक्के लोक असे आहेत. आम्ही दिवसभर ड्रग्ज घेत नाहीत किंवा वाईट गोष्टीच करत राहतो असं नाही. चांगल्या कामांमध्येही आमचा सहभाग असतो, यावर तुम्ही लक्ष द्याल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील याबद्दल बोलाल तर खूप फरक पडू शकतो" असेही सुनिल शेट्टी म्हणला.

2022 मध्ये बॉयकॉट ट्रेंड चालवण्यात आला त्या चित्रपटांमध्ये आमिर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' ते अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन', 'दोबारा' आणि 'लिगर' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. लोकांमध्ये बॉलीवूड आणि हिंदी चित्रपटांबद्दल इतका राग आहे की आता चित्रपटाचे नाव ऐकताच लोक त्याविरोधात बॉयकॉट ट्रेंड करु लागले आहेत.

दरम्यान पुढील महिन्यात लखनऊमध्ये होणाऱ्या 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट'आधी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. या भेटी दरम्यान सीएम योगी यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची भेट घेतली आणि नोएडा फिल्म सिटीमध्ये शूटिंग आणि गुंतवणूकीच्या शक्यतांवर बैठकीत चर्चा झाली. यामुळे सुनील शेट्टी यांनी सीएम योगी यांना आवाहन केले आणि बॉलीवूडवर लागलेले डाद पुसण्यासाठी पंतप्रधान मोदींना हस्तक्षेप करत करण्यास सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

SCROLL FOR NEXT