sunil shroff death news actor from omg 2 akshay kumar sunil shroff SAKAL
मनोरंजन

Sunil Shroff: अक्षयच्या ओएमजी २ मधील अभिनेते सुनील श्रॉफ कालवश

OMG 2 मध्ये अभिनय केलेले सुनिल श्रॉफ यांचं निधन झालंय

Devendra Jadhav

Sunil Shroff Death News: मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी येत आहे. रिओ कपाडिया यांचे गुरुवारी निधन झाले आणि आता आणखी एका अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे. सुप्रसिद्ध कलाकार सुनील श्रॉफ यांचे निधन झाले.

सुनीलचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही मात्र ते अनेक दिवसांपासुन आजारी असल्याचे बोलले जात आहे. सुनील यांनी नुकतंच अक्षय कुमार-पंकज त्रिपाठीच्या 'ओह माय गॉड 2' सिनेमात अभिनय केला होता.

(sunil shroff death news actor from omg 2 akshay kumar sunil shroff)

सुनिल यांनी आजवर अनेक बॉलिवूड सिनेमा, मालिकांमध्ये काम केलंय. सुनिल श्रॉफ यांनी अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि रश्मीका मंदाना अशा अनेक कलाकारांसोबत काम केलंय.

सुनिल यांनी आजवर अनेक जाहीराती - सिनेमांमध्ये अभिनय केलाय. सुनिल यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

सुनील श्रॉफच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, 'ओह माय गॉड 2'पूर्वी त्यांनी 'शिद्दत', 'द फायनल कॉल', 'कबाड द कॉइन', 'ज्युली', 'अभय' आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कधी डॉक्टर तर कधी वडिलांची भूमिका साकारून त्यांनी या इंडस्ट्रीत विशेष स्थान निर्माण केले होते.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT