Sunny Deol Aamir Khan In Lahore 1947 movie  esakal
मनोरंजन

Lahore 1947 Movie : सनी आता आमिरलाही घेवुन जाणार पाकिस्तानात! राजकुमार संतोषीच्या 'लाहोर1947'ची झाली घोषणा

बॉलीवूडचा तारा सिंग सनी देओल आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे एकाच चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा होत आहे.

युगंधर ताजणे

Sunny Deol Aamir Khan In Lahore 1947 movie : सनीच्या गदर २ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असताना पुन्हा एकदा बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून गदर ३ विषयी वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यात प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.

बॉलीवूडचा तारा सिंग सनी देओल आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे एकाच चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा होत आहे. राजकुमार संतोषी यांनी त्यांच्या लाहोर १९४७ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली असून त्यात ते सनी आणि आमिरला कास्ट करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काही काळात या दोन्ही अभिनेत्यांकडून एक मोठी ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

आमिर आणि सनी पहिल्यांदाच एकत्र येणार असल्यानं त्यांच्याविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. यापूर्वी आमिरचा लाल सिंग चढ्ढा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला प्रेक्षकांनी नाकारल्याचे दिसून आले आहे. आमिरसाठी हा मोठा धक्का होता. त्यानं प्रेक्षकांचा कौल मान्य केल्यानंतर पुन्हा एकदा नव्या उत्साहात प्रेक्षकांना,चाहत्यांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

संतोषी यांच्या त्या ट्विटमध्ये असा उल्लेख आहे की, मोठी बातमी, सनी आणि आमिर खान हे लाहोर १९४७ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खान हा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये दिसणार अशी चर्चा होती. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश अरुण करणार होता.

याविषयी आमिरनं खुलासा करत आपल्यापुढे या कथेचा प्रस्ताव असून त्यावर अद्याप चर्चा सुरु आहे. मी त्याबाबत कोणताही विचार केलेला नाही. प्राथमिक चर्चा होत आहे. त्यावर काही निर्णय झाल्यास आपल्याला त्याविषयी माहिती होईलच. असे त्यानं म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! 'साेलापुरात आयटीपार्कसाठी उद्याेजकच जागा निवडणार'; हैदराबाद, पुण्यातील उद्योजकांचा लवकरच दौरा

Ganeshotsav 2025: गणपतीची सोंड उजवी की डावी? शास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या!

Dog Rescue: ‘ती’ने पिलांना काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर; पहाडसिंगपुऱ्यात ‘श्वान परिवारा’च्या मदतीसाठी सरसावले स्थानिकांचे हात

World Archery 2025: महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला ब्राँझ; जागतिक तिरंदाजी स्पर्धा, भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी

IndiaA VS AustraliaA: चारदिवसीय लढतीत भारत अ संघाचा पराभव; यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाची बाजी

SCROLL FOR NEXT