Kili Paul Video  esakal
मनोरंजन

Gadar 2 Song : 'मैं निकला गड्डी लेके...' गदरच्या गाण्यावर 'किली ब्रदर'चा डान्स!

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहणारा अभिनेता आहे.

युगंधर ताजणे

Kili Paul Video : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहणारा अभिनेता आहे. सध्या तो त्याच्या गदर २ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. वीस वर्षांहून अधिक काळानंतर गदर २ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गदरची क्रेझ मोठी आहे.

सोशल मीडियावर यापूर्वी गदर २ मधील गाणी आणि त्याची टीझर व्हायरल झाला आहे, त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाल्याचे दिसून आले आहे. अमिषा पटेल ही या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री असून तिनं देखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन यासंबंधीचे व्हिडिओ आणि पोस्ट केले होते. अमिषाला त्यामुळे ट्रोल व्हावे लागले होते. अमिषानं गदर २ मधील क्लायमॅक्स सांगून टाकला असेही नेटकऱ्यांनी म्हटले होते.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

यासगळ्यात सोशल मीडियावर किली पॉल हा चर्चेत आला आहे. किली पॉल माहिती नाही असा नेटकरी सापडणे विरळाच. भारतीय चित्रपट, संगीत, फॅशन याविषयी नेहमीच अपडेट असणाऱ्या किलीनं यापूर्वी बॉलीवूडच्या कित्येक गाण्यांवर डान्स केला आहे. त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतातही आला आहे. आता किली हा सनीच्या गाण्यावर थिरकताना दिसला आहे.

किलीनं गदर मधील मैं निकला गड्डी लेके या गाण्यावर डान्स केला आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटस भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे. टांझानियामध्ये राहणाऱ्या किली पॉलचा चाहतावर्ग जगभर पसरला आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यापूर्वी देखील किलीनं हिंदी चित्रपटातील गाण्यावर प्रभावी डान्स केला आहे.

फिल्म इंडस्ट्रीतील ९० च्या दशकांतील गाण्यांवर किलीनं केलेला डान्स हा नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. किलीसोबत त्याची बहिण नीमा पॉल देखील आहे. किलीनं तो व्हिडिओ सनी देओलला देखील टॅग केला आहे. कॅप्शन लिहिताना म्हटलं आहे की, ९० च्या दशकांतील सर्वाधिक प्रभावी हिरो असणाऱ्या सनी देओल यांनी माझे बालपण खूपच समृद्ध केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT