Sunny Deol Is In US for Medical Treatment Google
मनोरंजन

Sunny Deol ने उपचारांसाठी गाठली अमेरिका, काय झालं अभिनेत्याला? चाहते चिंतेत

सनी देओल अमेरिकेत उपचार घेत असला तरी सोशल मीडियावर मात्र चांगलाच सक्रिय पहायला मिळत आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता आणि राजकीय नेता सनी देओलनं(Sunny Deol) उपचारांसाठी अमेरिका गाठली हे कानावर पडलं अन् त्याच्या चाहत्यांच्या मनात धडकीच भरली. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडकर उपचारांसाठी अमेरिका गाठतात तो आजार दुश्मनालाही होऊ नये असं सारखं वाटतं. त्यामुळे आपल्या लाडक्या सनी देओलनं उपचारांसाठी अमेरिका गाठली हे कळल्यावर निश्चितच चाहत्यांना चिंता वाटणार यात दुमत नाही.(Sunny Deol Is In US for Medical Treatment)

आता थोडक्यात जरा सनी देओल कशासाठी,कोणत्या उपचारांसाठी अमेरिकेत गेला आहे हे जाणून घ्या. तर काही दिवस आधी शूटिंगच्या दरम्यान सनीच्या पाठीला जबरदस्त मार लागला होता. सुरुवातीला मुंबईत त्याच्यावर उपचार झाले पण त्यानं फारसा फरक पडला नाही म्हणून त्यानं अमेरिकेचा रस्ता धरल्याचं बोललं जात आहे. या पाठीच्या गंभीर दुखण्यामुळेच पंजाबच्या गुरुदासपुरचा संसद असलेला सनी देओल राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाचा हक्क बजावू शकला नव्हता.

यासंदर्भात सनी देओलच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे की,काही दिवस आधी सनी देओलच्या पाठीला मार लागला होता. मुंबईत उपचार सुरु होते पण त्यानंतर अभिनेत्यानं अमेरिकेत उपचारासाठी जाण्याचा निर्णय घेतला. यादरम्यानच राष्ट्रपती निवडणुका होत्या,पण अमेरिकेत असल्या कारणाने अभिनेता मतदानासाठी उपस्थित राहू शकला नाही. सध्या सनी देओलवर अमेरिकेत उपचार सुरु आहेत, आजारातून पूर्ण बरे झाल्यावर तो भारतात परत येणार असल्याचं बोललं जात आहे.

सनी देओलच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर सनी देओल पूजा भट्ट आणि डुलकार सलमानसोबत आर.बाल्किच्या 'चुप' सिनेमात दिसणार आहे. याव्यतिरिक्त तो 'गदर २' आणि 'अपने २' मध्ये देखील काम करत आहे. तो 'सूर्या'चे देखील शूटिंग करत आहे,हा मल्याळम क्राइम थ्रिलर 'जोसेफ'चा रीमेक आहे. या वर्षी एप्रिलमध्ये यातील अभिनेत्याचा लूक समोर आला होता. सिनेमात लांबलचक भरगच्च दाढी सनीच्या चेहऱ्यावर दिसत होती. खूपच साध्या कपड्यात शीडीवर बसून विचारात मग्न असलेला सनी त्या लूकमधनं समोर आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन एम.पद्मकुमारनं केलं आहे. त्यांनीच ओरिजनल सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

सनी देओल इन्स्टाग्रामवर नेहमी सक्रिय पहायला मिळतो. नुकताच त्यानं आपले वडील धर्मेंद्र आणि भाऊ बॉबी देओलसोबतचा एक फोटो शेअर केला होता. सनी देओल २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीशी जोडला गेला होता. त्यानं गुरुदासपूर मध्ये कॉंग्रेस नेता सुनील जाखडविरोधात निवडणूक लढवली होती. सनी त्यावेळी ८२ हजारांहून अधिक मतं मिळवत विजयी झाला होता. संसदेत खूप कमी वेळा उपस्थित राहिल्यानं सनी नेहमीच निशाण्यावर असतो. त्याच्यावर आपल्या संसदीय क्षेत्रातही खूप कमी वेळा उपस्थित राहिल्याचा आरोप लावला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT