sunny deol open up about gadar 2 and omg 2 clash with akshay kumar in koffee with karan 8 SAKAL
मनोरंजन

Sunny Deol on Akshay Kumar: 'मी अक्षय कुमारला विनंती केली होती, मात्र...', 'OMG 2' आणि 'गदर 2' क्लॅशबद्दल पहिल्यांदाच बोलला सनी देओल

अक्षय कुमारच्या या बोलण्याने दुखावला गेला सनी पाजी

Devendra Jadhav

Sunny Deol on Akshay Kumar Koffee With Karan 8: कॉफी विथ करण 8 सध्या चांगलंच चर्चेत आहे. पहिल्याच भागात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या उपस्थितीची चांगलीच चर्चा झाली.

आता कॉफी विथ करण 8 च्या दुसऱ्या भागात सनी देओल आणि बॉबी देओल ही देओल बंधु जोडी गप्पा मारताना दिसणार आहे.

यावेळी कॉफी विथ करण 8 मध्ये पहिल्यांदाच सनी देओल अक्षय कुमारच्या OMG 2 च्या क्लॅशबद्दल बोलताना दिसला.

(sunny deol open up about gadar 2 and omg 2 clash with akshay kumar in koffee with karan 8)

११ ऑगस्ट २०२३ ला सनी देओलचा गदर 2 आणि अक्षय कुमारचा OMG 2 हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफीसवर एकमेकांसमोर रिलीज झाले.

याबद्दल सनीने करण जोहरला सांगितले की, त्याने अक्षयला फोन केला आणि संघर्ष टाळण्याची विनंती केली कारण गदर 2 निमित्ताने सनी अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार होता. मात्र 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्माते आणि स्टुडिओचा असल्याचं अक्षयने सांगितले.

सनी पाजीने सविस्तर खुलासा केला की, “मला अनेक वर्षे यश मिळालेले नाही. मला कोणीही माझ्या सिनेमासमोर असावे असे वाटत नव्हते, परंतु तुम्ही कोणालाही रोखू शकत नाही. त्यामुळे साहजिकच तुम्हाला त्रास होतो. तेव्हा मला वाटलं, 'काही फरक पडत नाही.' पण सुरुवातीला मला वाटले की, जर तुमच्या चित्रपटासोबत कोणताही चित्रपट रिलीज होणार नसेल तर तुम्हाला थिएटर तर मिळतीलच. सनी म्हणाला.

गदर 2 आणि OMG 2 च्या रिलीज क्लॅशबद्दल सनीने अक्षयशी चर्चा केली. सनीने खुलासा केला, “मी अक्षयला विचारले, 'कृपया तुझ्या हातात सर्व आहे, तु प्लीज ११ ऑगस्टला सिनेमा रिलीज करु नको' पण अक्षय नाही म्हणाला, स्टुडिओ आणि इतर गोष्टी त्याने मला सांगितल्या.

दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होऊ शकतात, म्हणून मी म्हणालो, ठीक आहे, हरकत नाही. मी फक्त विनंती करू शकतो; यापेक्षा मी काही करू शकत नाही.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT